शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फाटलेल्या शिधापत्रिकांचा घेणार लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:12 IST

फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यात फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अन्न-धान्याच्या लाभासह विविध कामांसाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेचा वापर करण्यात येतो; परंतु अनेक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका फाटल्या आहेत, तसेच जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात फटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेऊन, संबंधित लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी २ फेबु्रवारी रोजी जिल्हा पुरवठा विभागाला दिले. त्यानुसार जिल्ह्यात फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. फाटलेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचे निर्देश ३ फेबु्रवारी रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षक व पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. फाटलेल्या शिधापत्रिकांची माहिती घेतल्यानंतर संबंधित शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.योजनानिहाय जिल्ह्यात अशा आहेत शिधापत्रिका!सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार २३ शिधापत्रिका आहेत. त्यामध्ये बीपीएल -८७ हजार ९५१, अंत्योदय योजनेंतर्गत - ४४ हजार ५५०, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत प्राधान्य गट - १ लाख ७ हजार ३११, शेतकरी -५० हजार ७२८, एपीएल (केशरी)-१ लाख ५हजार ३००, शुभ्र - २१ हजार ८३१ व अन्नपूर्णा योजनेंतर्गत- ३५२ शिधापत्रिकांचा समावेश आहे.पालकमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेऊन, संबंधित शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्याचे निर्देश जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षक व पुरवठा निरीक्षण अधिकाºयांना देण्यात आले आहेत.- बी.यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोला