शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात भर पावसात निघाली भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा : शेकडो भाविक झाले सहभागी

By atul.jaiswal | Updated: July 7, 2024 19:23 IST

भर पावसात निघालेल्या रथयात्रेत सहभागी शेकडो भाविकांनी केलेल्या जय जगन्नाथच्या गजराने आसमंत निनादून गेला होता.

अकोला: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरी धाम येथील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचे औचित्य साधून आंतराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) अकोला यांच्या वतीने रविवारी (७ जुलै) सायंकाळी शहरातून रथयात्रा काढण्यात आली. भर पावसात निघालेल्या रथयात्रेत सहभागी शेकडो भाविकांनी केलेल्या जय जगन्नाथच्या गजराने आसमंत निनादून गेला होता.

इस्कॉनचे विदर्भ झोनल पर्यवेक्षक पूज्य अनंतशेषप्रभूजी यांच्या मार्गदर्शनात व अकोला इस्कॉनचे अध्यक्ष पूज्य वैदर्भीचरण प्रभूजी यांच्या पुढाकारातइ सरकारी बगीचा परिसरातील इस्कॉन सेंटर येथून सायंकाळी भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या रथात भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणी माता सुभद्रा यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.

इस्कॉन सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर, भगवान जगन्नाथांचा जयघोष करत भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. पारंपरिक वाद्याच्या गजरात ही रथयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, राणीसती धाम, गांधी रोड, सीटी कोतवाली चौक, खोलेश्वर, सरकारी बगिचा अशी मार्गक्रमण करत मित्र समाज क्लब येथे आली. त्या ठिकाणी रथ यात्रेचा समारोप करण्यात आला. शहरातील अनेक भाविक या रथयात्रेत सहभागी झाले होते. रथयात्रेत सहभागी इस्कॉनच्या सदस्यांनी रथयात्रेचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वितरण केले.

भाविकांनी पावसात धरला फेररथयात्रा सुरु होण्यापूर्वीच शहरात पावसाने जाेरदार हजेरी लावली. पाऊस सुरु असतानाच रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. रथयात्रेत सहभागी झालेल्या महिला व पुरुष भाविकांनी हरे रामा-हरे कृष्णाच्या धूनवर भर पावसात फेर धरला. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

इस्कॉन धाममध्ये जगन्नाथ उत्सवरथयात्रेचा समारोप झाल्यानंतर इस्कॉन धाममध्ये भगवान जगन्नाथाचा भव्य उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाविकांना महाप्रसादाचे वितरण केल्यानंतर जगन्नाथ उत्सवाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :AkolaअकोलाJagannath Rath Yatraजगन्नाथ यात्रा