शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे दर गडगडले !

By admin | Updated: January 4, 2016 02:42 IST

तुरीचा हंगाम उरला पंधरा दिवसाचा.

अकोला : मागील दोन महिन्यापूर्वी गगणाला भिडलेले तुरीचे दर आजमितीस गडगडले असून, बाजारात सद्या तुरीला प्रतवारीनुसारी साडेसहा ते आठ हजार रू पयेपर्यत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. एकीकडे तूर काढणीचा हंगाम संपत आला आहे आणि तुरीच्य दरात सारखी चढ उतार सुरू असल्याने शेतकर्‍यांना दरवाढीची प्रतिक्षा आहे. तूर पिकाबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमाकांवर असून, लातूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, अकोला व नागपूर महाराष्ट्रातील तुरीचे प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. मागीलवर्षी व मागील दोन तीन महिन्यापूवीं तुरीचे दर हे १0 ते १२ हजार रू पये प्रतिक्विंटलवर पोहोचल्याने शेतकर्‍यांनी या खरीप हंगामात तुरीच्या पेरणीत वाढ केली. पंरतु डिसेंबरमध्ये तूर काढणीचा हंगाम सुरू होताच बाजारातील तुरीचे दर १२ हजार रू पयाहून साडेसहा ते आठ हजार रू पये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले आहेत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतवारी बघून साडेसहा हजार ते नऊ हजार रू पये प्रतिक्विंटलने तुरीची खरेदी केली जात आहे. दरम्यान, कापूस, सोयाबीन,मूग, उडीद पिकाचे उत्पादन यावर्षी कमी झाल्याने तूर साथ देईल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. पंरतु तुरीच्या दरात आजमितीस ३ ते ४ हजार रू पये क्विंटलने घसरण झाली आहे. डॉ.पंदेकृविच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग व एन.ए.आय.पी. कृषी विपणन माहिती केंद्राच्या संशोधन चमूने लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील तुरीच्या किमतीचे मासिक सरासरी पृथ्थकरण करू न समतोल हवामानात तुरीला डिसेंबर २0१५ घ सरासरीच्या किमती जवळपास ७,५00 ते ८000 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली होती. असे असले तरी देशातील तुरीचे अल्प उत्पादन व वाढलेले दर बघता चालू हंगामात तुरीचे १0 ते १२ हजार रू पये प्रतिक्विंटल दर टिकून राहतील शेतकर्‍यांनी अपेक्षा होती. पंरतु शेतकर्‍यांची निराशा झाली आहे.