शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैरणाचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:15 IST

अकोला: विदर्भात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी)दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत.

अकोला: विदर्भात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी)दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. पशुधनाला लागणाºया हिरव्या चाºयाची गरज भागविण्यासाठी पिंपळ, सुबाभूळ, कडुनिंबाचा चाराही विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे; पण या वैरणाचेही दर वाढले आहेत.मागील वर्षी अल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाले असून, त्याचसोबत चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात ज्वारी, कापूूस हे मुख्य पीक होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत या पिकाची जागा सोयाबीन पिकाने घेतल्याने विदर्भातील ही पारंपरिक पिके मागे पडली आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने पशुधनासाठी पोषक व आवश्यक कडबा कमी झाला. परिणामी, कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, एका कडबा पेंडीचा दर ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर या कडब्यापासून तयार होेणाºया कुट्टीचा दर ८ ते १२ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे. ही कुट्टी मात्र ओली करू न पशुपालकांना विकली जात आहे.यावर्षी तुरीच्या कुटाराचे दर तीन ते पाच रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले असून, सोयाबीनचे खाद्य (कुटार) जनावरे खात नसली तरी या कुटाराचा दर तीन रुपये किलो झाला आहे. हरभºयाचे कुटार पाच ते सात रुपये किलोपर्यंत गेले असून, सुबाभूळ, पिंंपळ, कडुनिंबाचा पाला दोन ते चार रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. चाºयाचे दर प्रचंड वाढल्याने शेतकºयांना पशुधन अडचणीचे वाटत असून, वाटेल त्या दरात पशुधन विकण्यात येत आहेत. गव्हाचे कुटार (गव्हंंडा) जनावरे खात नाहीत. तथापि, या गव्हंड्याचे दरही वाढले.- ज्वारीचे क्षेत्र घटले !विदर्भातील एकट्या अकोला जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत होते. तथापि, अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले असून, २०१८-१९ मध्ये १० ते १५ हजार हेक्टरपर्यंत पेरणी झाल्याने ज्वारीपासून मिळणाºया कडब्याचे दर वाढले.- कडबा पेंडीचा दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकºयांनी नवे तंत्रज्ञान वापरू न प्रथिनेयुक्त मूरघास तयार करण्याची गरज आहे. चाराटंचाईच्या या काळात गव्हंड्यावर मीठ, उसाची मळी टाकून चारा तयार करावा.डॉ.आर.बी.घोराडे,प्रमुख,ज्वारी संशोधन केंद्र,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती