शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

CoronaVirus : आता गंभीर रुग्णांची रॅपिड टेस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 10:26 IST

तासाभरातच कोरोनाचे निदान करणे शक्य होत असून, रुग्णाला योग्य उपचार मिळण्यास मदत होत आहे.

अकोला : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावा तसेच जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे तासाभरातच कोरोनाचे निदान करणे शक्य होत असून, रुग्णाला योग्य उपचार मिळण्यास मदत होत आहे.जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. हा प्रकार थांबविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने प्रभावी तोडगा म्हणून गंभीर रुग्णांची २१ जुलैपासून रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीर रुग्णाची रॅपीड अ‍ॅन्टिजन टेस्ट केल्यामुळे ३० मिनिटात संबंधित रुग्णाला कोरोना आहे किंवा नाही, याचे निदान होत आहे. त्यामुळे तासाभरात रुग्णावर योग्य उपचार करणे डॉक्टरांना शक्य होत आहे. वेळेवर उपचार मिळू लागल्याने मृत्युदर रोखण्यासही मदत होत आहे. यासाठी डॉ. अपर्णा वाहने आणि डॉ. कृष्णमुरारी शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे.

पाच दिवसांत ४१ चाचण्या; ९ पॉझिटिव्ह!गत पाच दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात ४१ गंभीर रुग्णांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या करण्यात आल्या. यातील ९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या रुग्णांना भरती केल्यानंतर तासाभरातच उपचार मिळणे शक्य झाले आहे.

गंभीर रुग्णांना कोरोना आहे किंवा नाही, याचे वेळेवर निदान झाल्यास त्यांना योग्य उपचार देणे शक्य होईल. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात गत पाच दिवसांपासून गंभीर रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रुग्णांना तासाभरात उपचार मिळायला सुरुवात झाली आहे.-डॉ. मीनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या