शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस दहा वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:35 IST

अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील एका १२ वर्षीय मुलावर सार्वजनीक शौचालयामध्ये अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयाने बुधवारी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील एका १२ वर्षीय मुलावर सार्वजनीक शौचालयामध्ये अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयाने बुधवारी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच २७ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.वाशिम बायपास परिसरातील रहिवासी एक १२ वर्षीय मुलगा २४ एप्रिल २०१८ रोजी घराजवळ खेळत असतांना याच परिसरातील सिध्दार्थवाडीयेथील रहिवासी गजानन कीसन अर्दळे याने मुलाला विविध आमीष देउन सार्वजनीक शौचालयामध्ये नेले. त्यानंतर सदर मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. कु णालाही सांगीतल्यास जिवे मारण्याची धमक ी दिली. त्यामूळे मुलगा घाबरलेल्या अवस्थेतच घरी गेला मात्र त्याच्या कुटुंबीयांनी मुलाची अवस्था ओळखली आणि या घटनेची तक्रार जुने शहर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपी गजानन अर्दळे विरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७, ३२३, आणि पोक्सो कायद्याच्या कलम ७,८,९, १० आणि ११ व १२ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर जुने शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजुचे १५ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी गजानन आर्दळे याला दोषी ठरवीत भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ अन्वये एक वर्ष शिक्षा दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्यांची आणखी शिक्षा, ३७७ अन्वये १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोक्सो कायद्याच्या कलम ७ आणि ८ अन्वये ५ वर्षांची शिक्षा ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या शिक्षा याच कायद्याच्या कलम ९,१० अन्वये ५ वर्षांची शिक्षा ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी दोन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ११ आणि १२ अन्वये ३ वर्षांची शिक्षा ३ वर्ष शिक्षा ५ हजार दंड आणि दंड न भरल्यास आणखी दोन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले. एकून २७ हजार रुपयांचा दंड आरोपीस ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहीले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाRapeबलात्कार