शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रामेश्वर पवळ शिवसेना शिंदे गटाच्या समन्वयकपदी 

By राजेश शेगोकार | Updated: April 22, 2023 16:26 IST

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविलेले रामेश्वर पवळ यांनी आता शिवसेना शिंदे गटाचा हाथ धरला आहे.

 राजेश शेगोकार, अकोला: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविलेले रामेश्वर पवळ यांनी आता शिवसेना शिंदे गटाचा हाथ धरला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणाऱ्या रामेश्वर पवळ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या समन्वयकपदाची जबाबदारी दिली आहे. सध्या राज्यातील राजकारण ‘पवार’ यांच्या अवतोभोवती फिरत असून, त्यात त्यांचे विश्वासू मानल्या जाणारे पवळ यांनी शिंदे गटात उडी घेतल्याने आगामी काळात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

वंजारी समाजाचे विदर्भातील नेते असलेल्या पवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून तब्बल २२ वर्षे काम केले. अकोला,  बुलडाणा, वाशीम हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. लगतच्या मराठवाड्यातील काही जिल्ह्याशीही त्यांची नाळ जुळलेली आहे. बुलडाणा ही जन्मभूमी तर कर्मभूमी वाशीम आणि अकोला राहिले आहे.  तत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. नंतर याच गावंडे पिता-पुत्रांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन येण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अन शरद पवार यांचा विश्वास प्राप्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे अकोला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे विभागीय समन्वयक (अमरावती),, प्रदेश चिटणीस, प्रदेश संघटक अशी अनेकानेक पदे भूषविली. या पदांवर काम करताना पक्षश्रेष्ठींना अपेक्षित सारेकाही दिले. आता त्यांनी  नागपुरातील हिवाळी अधिवेशनात शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश घेतला आहे. 

मुख्यमंत्री यांनी माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाच्या समन्वयकाची जबाबदारी दिली. त्यांनी दाखविलेला विश्वास कुठेही कमी होऊ देणार नाही. विदर्भासोबतच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना वाढविणार आहे. - रामेश्वर पवळ, समन्वयक,  (शिंदे गट).

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :AkolaअकोलाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना