शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रमण श्रावगीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:25 IST

अकोट : शहरातील गोलबाजार परिसरात परवान्याच्या क्षमतेपेक्षा  मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांची साठवणूक करून, नागरिकांच्या  जीवित्वास धोका निर्माण करणार्‍या रमण श्रावगीसह चौघांविरुद्ध  अकोट शहर पो.स्टे.ला १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअकोटात अवैध फटाके जप्त प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शहरातील गोलबाजार परिसरात परवान्याच्या क्षमतेपेक्षा  मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांची साठवणूक करून, नागरिकांच्या  जीवित्वास धोका निर्माण करणार्‍या रमण श्रावगीसह चौघांविरुद्ध  अकोट शहर पो.स्टे.ला १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर यांच्या विशेष पथकाने १४ ऑक्टोबरच्या रात्री श्रावगी  याच्या घरातील गोडावूनवर धाड घातली होती. रात्रभर सुरू  असलेल्या कारवाईत ३३ लाखांचे फटाके पोलिसांनी जप्त केले  आहेत. पोलीस सूत्रानुसार, गोलबाजार परिसरात नागरी वस्तीमध्ये गोदाम  व घरात  परवान्याच्या क्षमतेपेक्षा मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांची  साठवणूक केल्याची माहिती विशेष पथकाचे हर्षराज अळसपुरे  यांना मिळाली. त्यावरून १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३0 वाजता  सुमारास पाळत ठेवून रमण सीताराम श्रावगी याचे गोदाम व  घरावर छापा घातला. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात फटाक्यांचा साठा  मिळून आला. १५ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू हो ती. या प्रकरणी आरोपी  रमण सीताराम श्रावगी, सरिता रमण  श्रावगी, दिलीप चुन्नीलाल राठोड, सुहास प्रल्हाद वाघ  यांच्याविरुद्ध मानवी जीवित्वास धोका निर्माण होईल, अशाप्रकारे  परवान्यापेक्षा जास्त फटाक्यांची साठवणूक केल्याच्या  कारणावरून भादंविच्या २८६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्या त आला. सदर गोदाम व घरामधून एकूण ३३ लाख ९१ हजार  ६00 रुपये किमतीचे फटाके जप्त करण्यात आले असून, चारही  आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या  प्रकरणात आरोपी असलेला रमण श्रावगी याचे विरुद्ध प्रतिबंधित  चायनीज मांजा विक्रीप्रकरणीसुद्धा दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल  करण्यात आला होता. 

फटाके परवान्याची चौकशी होणार! दिवाळीच्या उत्सवादरम्यान फटाके विक्रीची दुकाने मोठय़ा  प्रमाणात थाटल्या जातात. त्याकरिता आवश्यक असलेला  परवाना काढण्यात येतो, परंतु परवानाधारक दुकान न लावता  आपला परवाना भाड्याने देत असल्याची माहिती पोलीस व  महसूल विभागाला प्राप्त झाली आहे. परवानाधारकाने स्वत:  दुकानावर बसून दुकानाची सुरक्षितता ठेवणे गरजेचे आहे.  शिवाय फटाके या स्फोटक पदार्थ साठवणुकीकरिता गोदामाच्या  परवानगीकरिता ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. तसेच  नागरी वस्तीत फटाक्याचे गोदाम असणे नागरिकांच्या जीवित्वास  धोका निर्माण करणारे असल्याने पोलीस व महसूल प्रशासनाने  फटाक्याचा प्रश्न गंभीरतेने घेतला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा