शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

‘सीबीएसई’ दहावीच्या परीक्षेत राजनंदिनी अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:10 IST

स्कूल आॅफ स्कॉलर हिंगणा रोडची विद्यार्थिनी राजनंदिनी मानधने हिने ९९ टक्के गुण घेत अव्वल स्थान पटकावले.

अकोला: सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी घोषित झाला. यंदा जिल्ह्याचा निकाल ९८ टक्के लागला असून, दहावी परीक्षेत जिल्ह्यातून मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्याचे निकालावरून दिसून येत आहे. स्कूल आॅफ स्कॉलर हिंगणा रोडची विद्यार्थिनी राजनंदिनी मानधने हिने ९९ टक्के गुण घेत अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ नोएल स्कूलची सायली खेडकर, एसओएसचा अमेय राठोड, ओम गायकवाड यांनी अनुक्रमे ९८.४0 टक्के गुण मिळविले. प्रभात किड्स स्कूलचा दीप उनडकाट याने ९८.0४ टक्के तर नोएल स्कूलचे रूजल गावंडे, प्रभातची आस्था लोहिया, ख्याती लोया, जवाहर नवोदय विद्यालयाची निकिता बंड यांनी अनुक्रमे ९८ टक्के गुण मिळवित घवघवीत यश प्राप्त केले.जिल्ह्यातील सीबीएसई अभ्यासक्रमाच्या सहा शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये स्कूल आॅफ स्कॉलर्सचे वेदांत नलगे, श्रद्धा गुलाक्षे यांनी ९७.२0, मानसी पुंडकर, साक्षी आळशी यांनी ९७, विक्रांत पाटील, गायत्री जाधव, योगेश राणे, ओम नरडे यांनी ९६.८0, हिमानी अग्रवाल, निलय चोपडे, श्रृती पाटील, नचिकेत महल्ले यांनी ९६ टक्के गुण प्राप्त केले. प्रभातच्या ध्रुव सारडा ९७.६, गायत्री मिश्रा ९७.४, हर्ष कुलकर्णी ९७.४, आदित्य राठी ९७.४, रसिका रहाने ९६.८, अंकुश पाटील ९६.६, सृष्टी म्हैसने ९६.६, ओम मानकर ९६.२, वेदांज बंकेवार ९६, अमिशा साहू ९६, साहिल वाडकर ९५.४, गायत्री धनोकार ९५.२, अथर्व दाबेराव ९५.२, महिमा जैन ९५, तनया काकड ९४.८ यांचा समावेश आहे. नोएल स्कूलच्या कोमल पवार ९७.२0 टक्के, साक्षी डाबेराव ९६.४0 टक्के, करिष्मा चव्हाण ९६.२0 टक्के, कविता इंगळे ९५.६0, श्रेयश डिकोंडवार ९५.६0, खुशी झिने ९५.२0, माधवराव सोनोने ९५ यांनी घवघवीत यश मिळविले आहे. जवाहर नवोदय विद्यालयाच्या नितीन भांबरे याने ९५.२0 टक्के, ईश्वर पोटे ९४.६0, प्रणव बेलेकर ९३.४0, खुशी वाडेकर ९३ टक्के यांनीही यश मिळविले. त्याबरोबर कुंभारी येथील ज्युबिली इंग्लिश हायस्कूलच्या लावण्या पिंजरकर ९६, प्राची वाघमारे ९५.0८, मानसी साठे ९५.0४, प्रणव जोशी ९४.६, शिवांगी देशपांडे ९४.२, खुशी राऊत ९३.८, गायत्री पांडे ९३.२ यांनीही प्राविण्यश्रेणी प्राप्त केली. एमराल्ड हाइट्स स्कूलचे वैष्णवी राठोड ९७, शंतनु जावडे ९५.७, श्रृती कंकाळ ९५, तन्मय नवघरे ९४.८ यांनी घवघवीत यश संपादन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र