शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पिकांना पावसाचा बुस्टर डोस!

By admin | Updated: July 14, 2017 02:03 IST

बुधवारपासून हलका पाऊस; विदर्भातील दहा जिल्ह्यांत सरासरी घसरलेलीच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बुधवारपासून विदर्भात तुरळक व हलका पाऊस सुरू असल्याने तिबार पेरणीपासून वाचलेल्या पिकांना हा बुस्टर डोस मानल्या जात आहे. ढगाळ वातावरण व हलका पाऊस या पिकांना संजीवनी घेऊन आला आहे. उर्वरित पेरणीसाठी हा पाऊस पूरक नसल्याने शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पावसाची सरासरी घसरलेलीच असून, ही आकडेवारी अमरावती जिल्ह्यात सरासरी ४२ मि.मी. पाऊस कमी आहे.यावर्षी सार्वत्रिक दमदार पाऊस नसल्याने राज्यासह विदर्भातील पेरण्या खोळंबल्या असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. विदर्भात मूग, उडीद हे महत्त्वाचे पीक आहे. मागील पाच वर्षांपासून या पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेच नाही. यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु योग्य वेळी पाऊस झाला नसल्याने हे पीक यावर्षीही शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. कापूस, सोयाबीनची पेरणीची वेळही गेली आहे. १५ जुलैपर्यंत पेरणी करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञ देत असले, तरी पाऊसच नसल्याने शेतकरी पेरणार कसा, हा प्रश्न आहे. ६ जून ते १३ जुलै या कालावधीत एकदाही ७५ ते १०० मि.मी. पेरणीलायक पाऊस झाला नाही.दरम्यान, ६ जून ते १३ जुलै या पावसाच्या कालावधीत विदर्भातील पावसाची सरासरी घसरली असून, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४२ मि.मी. पाऊस कमी आहे. नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या ३० मि.मी. पाऊस कमी आहे, तसेच भंडारा ३६, गोंदिया ३५, अकोला २८, यवतमाळ २३, चंद्रपूर ३८, गडचिरोली ३०, वाशिम १३ तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ७ मि.मी. पाऊस कमी आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यात परभणी येथे सरासरी २८ मि.मी. पाऊस कमी असून, सांगली जिल्ह्यात ३७ मि.मी., कोल्हापूर २८, औरंगाबाद १८, जालना ५, नांदेड १५, सातारा १७, रत्नागिरी ७, सिंधुदुर्ग १५ तर मुंबई शहरात सरासरी ३० मि.मी. पाऊस कमी आहे. पावसाचा अंदाज१४ ते १७ जुलैपर्यंत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पावसाचा इशारा १४ जुलै रोजी उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.