शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका

By राजेश शेगोकार | Updated: March 19, 2023 20:18 IST

तेल्हारा तालुक्यात १२०० हेक्टर क्षेत्र बाधित: सर्व्हे करण्याची मागणी

राजेश शेगाेकार, अकोला: गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव झाला असून, त्यामुळे तब्बल १ हजार ७२८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असल्याने पंचनामे रखडले आहेत. नुकसानग्रस्त भागात अधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी, कागदोपत्री काहीच अहवाल घेतला नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता.

त्यानुसार, जिल्ह्यात अवकाळी पावसाने पातूर, बार्शीटाकळी तालुक्यासह ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तसेच दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाच्या गारांनी पातूर तालुक्याला झोडपले. पातूर तालुक्यातील पांगरताटी, आलेगाव, उंमरवाडी, पिंपरडोली, राहेर, उमरा आदी गावांमध्ये गारा पडल्या. तर इतर भागात जोरदार पाऊस झाला. रविवारीही रिमझिम पाऊस सुरूच होता. अवकाळी पावसामुळे तेल्हारा, पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील १७२८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. त्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी थांबत नसल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.११८४ शेतकऱ्यांचे नुकसानप्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे १ हजार १८४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून पाहणी केली जात आहे; मात्र कागदोपत्री काहीच अहवाल घेतला जात नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

असे झाले नुकसान

तालुका - बाधित क्षेत्र

तेल्हारा - १२०० हेक्टरपातूर - ३७४ हेक्टरबार्शीटाकळी - १५४ हेक्टर

भंडारज बु. परिसरात लिंबू, भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान

सतत दोन दिवसांच्या पावसामुळे व वाऱ्यामुळे पातूर तालुक्यातील भंडारज बु. व भंडारज खु . या गावातील रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, हायब्रीड ज्वारी, फळबाग, लिंबू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी रवींद्र खेकडे, नयन अमानकर, दीपक शेंडे, संजय उजाडे, गणेश म. शेंडे, नंदू ठाकरे, गजानन राऊत, अक्षय भागे, दीपक इंगळे, बाबुलाल सुरवाडे, सुधाकर गव्हाळे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Akolaअकोला