शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rain: अकोला जिल्ह्यात जोर 'धार'; घरांत घुसले पाणी! नदी-नाल्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

By संतोष येलकर | Updated: July 22, 2023 14:11 IST

Heavy Rain in Akola : अकोला - जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आले असून, पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील विविध भागांत पुराचे पाणी अनेक घरांत घुसले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

- संतोष येलकरअकोला - जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आले असून, पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील विविध भागांत पुराचे पाणी अनेक घरांत घुसले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला. शनिवारी सकाळपासून आणखी धो - धो पाऊस बरसत  आहे. सतत जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच भागांत नदी - ओढे व नाल्यांना पुर आले.  त्यामध्ये काही गावांत पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक भागांत पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने घरांच्या नुकसान झाले असून, घरांमधील विविध वस्तू पुरांत वाहून गेल्या.पुरात वाहून गेलेल्या ' त्या ' दोघांना वाचविले!जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी शिवारातून पुरात वाहून गेलेल्या दोघांना शोध व बचाव पथकाने वाचविले, असे जिल्हा  आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा समन्वयक संदीप साबळे यांनी सांगितले.

वाहतूक बंद; जनजीवन विस्कळीत !सतत बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात नदी - नाल्यांना पूर आले असून , पुलांवरुन पुराचे पाणी वाहत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली असून, जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र आहे. अकोला शहरातही रस्ते जलमय!अकोला शहरात सकाळपासून सतत जोरदार बरसत असलेल्या पावसामुळे अकोला शहरातील विविध भागांत रस्ते दुपारपर्यंत  जलमय झाले. शहरातील उमरी, मलकापूर , वाशिम रोड बायपास, खडकी, शिवसेना वसाहत, डाबकी रोड आदी परिसरात रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

पिके बुडाली पाण्यांत; शेतकरी हवालदिल!सतत बरसणारा पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतात पाऊस आणि पुराचे पाणी साचले असून, पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणीनंतर उगवलेली पिके पाण्यात बुडाल्याने पेरणीसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोला