शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Rain: अकोला जिल्ह्यात मुसळधार, कानडी परिसरात गारपीट

By रवी दामोदर | Updated: September 11, 2022 14:37 IST

Akola: हवामान विभागाच्या अंदाजानुसार विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.

-रवी दामोदरअकोला: हवामान विभागाच्या अंदाजानुसार विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी परिसरात वादळीवाऱ्यासह गारपीटही झाली. मुसळधार झालेल्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फटका बसला असून, शेतकरी अडचणीत आला आहे.भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने सुरूवात केली. वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस झाला. दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी शिवारात गारपीटही झाली. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती आहे.

 जिल्ह्याला तीन दिवस येलो अलर्टप्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्याला दि.१४ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट मिळाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस पिकांसाठी पोषक असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन-तीन दिवसांपासून उष्णतेने त्रस्त असलेल्या अकोलेकराना दिलासा मिळाला.निंबा परिसरात शेतशिवार जलमयबाळापुर तालुक्यातील निंबा फाटा परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने शेत शिवार जलमय दिसून आले. तसेच निंबा फाटा ते काजिखेड या मार्गावर वादळ वाऱ्यामुळे दोन ते तीन झाडे पडले होते. दरम्यान शेतात पाणी साचल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Akolaअकोला