शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

परतीचा पाऊस तूर, प-हाटीला पोषक!

By admin | Updated: September 17, 2015 23:18 IST

विदर्भातील शेतक-यांच्या आशा पल्लवित.

अकोला : परतीच्या पावसाचे दमदार आगमन झाले असून, हा पाऊस तूर, पर्‍हाटी (कापूस) या पिकाला पोषक ठरणार असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दोन महिने पावसाची झळ बसलेल्या या पिकाला सध्या बहर आला आहे. कापसाला फुले, पात्या धरल्या आहेत, तर तूर डोलू लागली आहे. ५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, अनेक जिल्हय़ात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात दुष्काळी जिल्हय़ाचा समावेश असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी हवामान शास्त्रज्ञांच्या मते या महिन्यात पाऊस अपेक्षित असून, या पुढे दुष्काळीपट्टय़ात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही काही काळात पाऊस येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून मान्सून परत जाण्यासंदर्भातील २00५ ते २0१४ दरम्यानचा अभ्यास करून ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञांच्या मते, यावर्षी १५ ते २0 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतण्याची शक्यता आहे. या काळात अचानक ढग जमा होतात व पाऊस कोसळतो. त्यामुळे आणखी एक महिना मान्सून आणि मान्सूनेत्तर पावसाचा कालावधी राहणार आहे. याशिवाय नोव्हेंबर महिन्यातही अवेळी पावसाची शक्यता आहे. २0१३-१४ मध्ये परतीच्या पावसाने चांगला दिलासा दिल्याने रब्बी पिकाला हा पाऊस पोषक ठरला होता. यावर्षी १५ सप्टेंबरला परतीचा पाऊस सुरू झाला असून, दोन ते तीन दिवसाआड पाऊस कोसळत असल्याने या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होईलच शिवाय खरीप हंगामातील पर्‍हाटी (कापूस) आणि तूर या पिकाला पोषक ठरणार आहे. दोन महिने पावसाचा खंड पडल्याने या दोन्ही पिकांची वाढ खुंटली होती तथापि गत आठ-आठ दिवसापासून अधून-मधून पडत असलेल्या या पावसामुळे पर्‍हाटीला फुले, पात्या धरल्या असून, तूर पीक डोलू लागले आहे. ज्या शेतकर्‍यांनी ऑगस्टमध्ये सोयाबीन पेरणी केली, त्या सोयाबीन पिकाला हा पाऊस पोषक ठरत असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनलाही फायदा होणार आहे. परतीचा पाऊस रब्बी पिकांना पोषक तर ठरेलच खरीप हंगामातील पर्‍हाटी (कापूस), तूर या पिकाला परतीचा पाऊस दिलासादायक ठरला आहे. यामुळे ही दोन्ही पिके चांगली येतीलच शिवाय शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेलल्या सोयाबीनलाही पोषक ठरणार असल्याचे कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दिलीप मानकर यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.