शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-खंडवा रेल्वे मार्गावरील रेल्वेची गती वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:28 IST

अकोला : मध्य प्रदेशातील खंडवा स्टेशनहून मलकापूर मार्गेअकोल्यात पोहोचणारी प्रवासी रेल्वेगाडी आणि मालगाडी यांची गती वाढणार आहे. या सर्व ...

अकोला: मध्य प्रदेशातील खंडवा स्टेशनहून मलकापूर मार्गेअकोल्यात पोहोचणारी प्रवासी रेल्वेगाडी आणि मालगाडी यांची गती वाढणार आहे. या सर्व रेल्वेगाड्या याआधी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबायच्या. या गाड्यांना इतर प्लॅटफॉर्मवर थांबण्याची व्यवस्था नव्हती; मात्र ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे मंडळाने एकत्रित येऊन पॉइंट देण्याची सुविधा केली. त्यामुळे या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वर थांबू शकतील. अशी माहिती भुसावळ रेल्वे मंडळाचे ‘एडीआरएम’ मनोज कुमार सिन्हा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे एडीआरएम मनोज कुमार सिन्हा, भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसने अकोल्यात आले होते.खंडवाहून अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचणारी प्रवासी गाडी आणि मालगाडी यापूर्वी थांब्यासाठी ताटकळत राहत असे. एकच प्लॅटफॉर्मवर लाइन दिल्या जात असल्याने ही समस्या निर्माण व्हायची. त्यामुळे प्रवाशांना उशीर व्हायचा; मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ ची सुविधा मिळाल्याने आता या मार्गांवरील गाड्यांची गती वाढणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मंगळवारी दक्षिण मध्य रेल्वेचेचे नांदेड येथील प्रबंधक कार्यालयाचे तंत्रज्ञही अकोल्यत पोहोचले. गत अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या या तांत्रिक मागणीवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला गेला. यासंदर्भात ‘लोकमत’ने अनेकदा हा विषय प्रकाशझोतात आणला. याबाबत खासदार संजय धोत्रे यांच्याशीदेखील चर्चा करण्यात आली होती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही मागणी पूर्ण झाली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरण