शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष देऊन युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:47 IST

अकोला - रेल्वे स्थानकांवरील उद्घोषकासह विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लावण्याचा कंत्राट मिळाल्याचे आमिष दाखवून एका वेंडरने युवतीवर सतत बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देएका वेंडरने एका युवतीला रेल्वेत उद्घोषक म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून भूलथापा दिल्या.मामाच्या निवासस्थानी आणि शेगाव येथे नेऊनसुद्धा अत्याचार करण्यात आल्याची माहिती युवतीने पोलिसांना सांगितली. फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.

अकोला - रेल्वे स्थानकांवरील उद्घोषकासह विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लावण्याचा कंत्राट मिळाल्याचे आमिष दाखवून एका वेंडरने युवतीवर सतत बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या युवतीने थेट पोलीस अधीक्षकांकडे ही तक्रार दिली असून, पोलीस अधीक्षकांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.रेल्वे स्थानकावर बिसलरी व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका वेंडरने एका युवतीला रेल्वेत उद्घोषक म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून भूलथापा दिल्या. त्यानंतर वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. तुझा आवाज चांगला असल्याने तुला उद्घोषक म्हणून लावून देतो, असे म्हणून त्याने युवतीचे वारंवार लैंगिक शोषण केले. मामाच्या निवासस्थानी आणि शेगाव येथे नेऊनसुद्धा अत्याचार करण्यात आल्याची माहिती युवतीने पोलिसांना सांगितली. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने, युवतीने थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. लैंगिक शोषण झाल्यानंतर युवतीने नोकरीसाठी वारंवार पाठपुरावा केला असता, या वेंडरने तिला नोकरी दिली नाही. तसेच तिची टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी युवतीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. पीडितेवरच दबाव आणण्याचा प्रयत्नया प्रकरणातील आरोपीने त्याच्या पत्नीला समोर करून पीडितेची पोलिसात तक्रार करून, तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या पत्नीने युवतीवर दबाव आणण्यासाठी तिच्याविरोधात तक्रार करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRapeबलात्कारAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक