शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अकोल्यातील जुने शहरात साकारला भव्य ‘रायगड’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:32 IST

अकोला : जुने शहरातील रेणुका नगरमध्ये येत्या ४ मार्च रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त भव्य रायगड किल्ला साकारण्यात आला आहे. यावेळी कौटुंबिक परिस्थिती बिकट असणार्‍या मुलींच्या लग्नासाठी तसेच शहरातील अनाथ आश्रमासाठी आर्थिक स्वरूपात मदत करून खारीचा वाटा उचलणार असल्याची माहिती उपमहापौर वैशाली शेळके यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

ठळक मुद्देसार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने दिली माहिती गरजूंना मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील रेणुका नगरमध्ये येत्या ४ मार्च रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त भव्य रायगड किल्ला साकारण्यात आला आहे. यावेळी कौटुंबिक परिस्थिती बिकट असणार्‍या मुलींच्या लग्नासाठी तसेच शहरातील अनाथ आश्रमासाठी आर्थिक स्वरूपात मदत करून खारीचा वाटा उचलणार असल्याची माहिती उपमहापौर वैशाली शेळके यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जुने शहरातील डाबकी रोड परिसरात मागील २३ वर्षांपासून जय बाभळेश्‍वर सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यंदा रविवार, ४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रायगड किल्ला उभारण्यात आला असून, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमहापौर वैशाली शेळके यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, खा. संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील, ‘लोकमत’चे उप महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, ‘लोकमत’चे निवासी संपादक रवी टाले, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष गजाननराव पावसाळे, स्थायी समिती सभापती बाळ टाले, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांच्यासह गणमान्य व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्याचे उपमहापौर शेळके यांनी सांगितले. ४ मार्च रोजी जय बाभळेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शिवरायांचे मूर्तीपूजन केले जाणार असून, ६ ते ७ यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते समाजातील गरजूंना आर्थिक स्वरूपात मदत दिली जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता शिवरायांच्या मिरवणुकीला प्रारंभ होऊन डाबकी रोड मार्गे कस्तुरबा गांधी रुग्णालयामागील संत गाडगेबाबा व्यायाम शाळा येथे रात्री १0 वाजता मिरवणुकीचा समारोप होणार असल्याची माहिती मनपाचे मा. सभापती विलास शेळके यांनी दिली. शिवरायांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून या कार्यक्रमात समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला जात असून, शिवरायांचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी समस्त अकोलकरांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन  राष्ट्रवादीचे मा. नगरसेवक मनोज गायकवाड, जय बाभळेश्‍वर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश शाहू यांनी केले. पत्रकार परिषदेला भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर, अनिल गरड, सतीष ढगे, तुषार भिरड, नगरसेविका रंजना विंचनकर, शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके, राष्ट्रवादीचे नगरसेवक अजय रामटेके, मा. नगरसेवक राजेश काळे, काँग्रेसचे पदाधिकारी विलास गोतमारे, श्याम विंचनकर आदी उपस्थित होते.  

‘जिजाऊं’च्या  लेकींचा पुढाकार!जुने शहरातून निघणार्‍या शिवरायांच्या मिरवणुकीत यंदा मोठय़ा प्रमाणात जिजाऊंच्या लेकींचा सहभाग राहणार असून, महिला, लहान मुले, नागरिकांची काळजी घेण्यासाठी मंडळाचे २00 कार्यकर्ते सज्ज राहणार असल्याची माहिती सेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी दिली. 

टॅग्स :Akolaअकोला