शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात छापेमारी; ४४ गाेवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या; १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत उभारले हाेते चेकनाके

By आशीष गावंडे | Updated: June 17, 2024 22:49 IST

पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात.

अकाेला: शेतकऱ्यांचे गाेधन चाेरीला जात असल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार बकरी इदच्या पृष्ठभूमिवर जिल्हाभरात छापेमारी करुन तब्बल ४४ गाेवंश तस्करांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, २० गाेवंशांना जीवनदान मिळाले असून या कारवाइसाठी १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत तात्पुरते २७ चेक नाके उभारण्यात आले हाेते,हे विशेष. 

पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात. शेतकऱ्यांचे गाेधन चाेरुन त्यांची निर्दयतेने कत्तल हाेत असल्याचे पाहता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जिल्हाभरातील पाेलिस यंत्रणेला गाेवंश तस्करांना हुडकून काढत त्यांना बेड्या ठाेकण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुषंगाने १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत तात्पुरत्या स्वरुपाचे चेक नाके उभारण्यात आले.

मागील १७ दिवसांच्या कालावधीत अवैधरित्या गोवंशाची निर्दयतेने वाहतुक करुन त्यांची कत्तल करणाऱ्या तस्करांना पकडण्याची माेहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाभरात ४० केसेस दाखल केल्या असून ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाइ दरम्यान, २० गोवंशांना जीवनदान देण्यात आले. पाेलिसांनी चार वाहनासह १४ लक्ष ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पाच महिन्यांत १०४ तस्करांना बेड्याबच्चन सिंह यांनी १ जानेवारी राेजी जिल्हा पाेलिस अधीक्षक पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच क्राइम मिटींगमध्ये गाेवंश तस्करीला समुळ उखडून टाकण्याचे निर्देश दिले हाेते. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत याप्रकरणी शहरासह जिल्ह्यातील पाेलिस ठाण्यांत ८५ गुन्हे दाखल करण्यात येऊन १०४ तस्करांना अटक करण्यात आली आहे. तसेच तस्करांकडून तब्बल ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाइला गती देण्याची सूचनागाेधन चाेरीला जात असल्याने शेतकरी वर्ग मानसिकरित्या खचून जाताे. वाहनात गाेवंशांना काेंबून त्यांची कत्तल करणाऱ्या तस्करांना पकडण्याच्या कारवाइला गती देण्याची सूचना जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी पाेलिस यंत्रणेला दिली आहे.