शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बडया जुगारावर छापा;१५ जुगारी अटकेत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:27 IST

१५ जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोला : रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाजुक नगरात खुलेआम सुुरु असलेल्या मोठया जुगार अड्डयावर जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री उशीरा छापा टाकला. या जुगार अड्डयावरुन १५ जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे रामदास पेठ पोलिसांचे अर्थकारण उघड झाले असून येथील डीबी पथक संशयाच्या घेऱ्यात सापडले आहे.नाजूक नगर येथील दाट लोकसंख्या असलेल्या वस्तीत जुगार अड्डा सुरु असुन या अड्डयावर नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकु मार बहाकर यांना मिळाली. या माहितीवरुन पथकाने सापळा रचून जुगारावर छापा टाकल्यानंतर अजहररूद्दीन हफिजोद्दीन वय २२ वर्ष रा.मोहता मिल जवळ नाजुक नगर, मोहम्मद रेहाण मोहम्मद लुकमान वय २० वर्ष रा.ताज चौक अकोट फाईल, अयाज खा दाउद खान वय ३५ वर्ष रा.नया बैदपुरा अरबी मदरसा जवळ, अयाज अहेमद अब्दुल अमीर वय २२ वर्ष रा. नया बैदपुरा अरबी मदरसा जवळ, जिशान खान दाउदखान वय २१ वर्ष रा. नया बैदपुरा, हुसेन पिरू चौधरी वय ४० वर्ष रा.शहनवाजपुरा नायगाव, मोहम्मद सलीम चौधरी वय २८ वर्ष रा.मनकर्णा प्लॉट,मोहम्मद अशपाक मोहम्मद अन्वर वय २७ वर्ष रा.मुजफर नगर, ईमाण खान अमीन खान वय २६ वर्ष रा. नाजुक नगर, शेख हसन शेख ईबाहीम वय २५ वर्ष रा.नाजुक नगर, शेख मोहसीन शेख मुसा वय ३१ वर्ष रा.मोहता मिल रोड, शेख राजु शेख जाफर वय ३२ वर्ष रा. मोहता मिल रोड, मोहम्मद युनुस मोहम्मद हनिफ वय २२ वर्ष रा.मोहता मिल रोड,जिबरान खान अमीन खान वय २५ वर्ष रा. मोहता मिल रोड,शेख अमीर हसन पटेल वय ४२ वर्ष रा.मोहता मिल रोड गवळी पुरा यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम ५२ हजार २७०, मोबाईल १२ किंमत १ लाख ५२ हजार रुपये, एक अ‍ॅटो व तीन मोटर सायकल किंमत ३ लाख ३० हजार असा एकुण ५ लाख ३४ हजार २७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत वांघुर्डे, यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकूमार बहाकर यांनी व त्यांच्या पथकाने केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी