शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘ओबीसीं’च्या प्रश्नांवर राहुल गांधींची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 04:04 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभरातील विविध समुदायांसोबत सध्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्येच इतर

राजेश शेगोकार/लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभरातील विविध समुदायांसोबत सध्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्येच इतर मागासवर्गीय घटकांच्या समस्या व त्यांच्यासमोर असणाऱ्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी प्रत्येक राज्यातील निवडक नेत्यांसोबत राहुल गांधी हे स्वत: चर्चा करीत असून, २२ जुलै रोजी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या संवादासाठी निवडलेल्या राज्यातील २४ प्रतिनिधी पश्चिम वऱ्हाडातील दोन आमदारांसह पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर राज्यातील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे हतबल झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा नवी उमेद देण्यासाठी विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत आहे. विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच समाजातील विविध घटकांसोबत संवाद असावा, त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेत त्यादृष्टीने पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: पुढाकार घेत असून, त्यामधूनच समाजाच्या विविध घटकांमधील पदाधिकाऱ्यांसोबत संवादाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ जुलै रोजी दिल्ली येथे ‘ओबीसीं’ संदर्भात झालेल्या बैठकीत खासदार राजीव सातव, विजय वडेट्टीवार, बुलडाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, आमदार अमित झनक, अकोल्याचे प्रकाश तायडे यांच्यासह अलका राठोड, रमेश राख आदी २४ प्रतिनिधींचा समावेश होता. काँग्रेस पक्षाने ‘मला कर्जमाफी मिळालीच नाही’, असे आंदोलन सुरू केले असून, त्याद्वारे कर्जमाफीमधील फसवेगिरी समोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचेही नेत्यांनी सांगितले. ओबीसींच्या न्यायासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरले पाहिजे, असे निर्देश राहुल यांनी दिले.