शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राफेलने मोदी अडकले कात्रीत - अ‍ॅड. आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:13 IST

अकोला : राफेल विमान खरेदीची किंमत सर्वोच्च न्यायालयापुढे उघड करावीच लागणार आहे. तसे न केल्यास न्यायालय केंद्राला नोटीस देईल. तरीही माहिती न दिल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणारा देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून मोदीची नोंद होईल. किंमत उघड झाल्यास त्याचे स्पष्टीकरण देताना संघाच्या नाकीनऊ येणार आहे, अशा कात्रीत मोदी अडकणार आहेत, असे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.

अकोला : राफेल विमान खरेदीची किंमत सर्वोच्च न्यायालयापुढे उघड करावीच लागणार आहे. तसे न केल्यास न्यायालय केंद्राला नोटीस देईल. तरीही माहिती न दिल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणारा देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून मोदीची नोंद होईल. किंमत उघड झाल्यास त्याचे स्पष्टीकरण देताना संघाच्या नाकीनऊ येणार आहे, अशा कात्रीत मोदी अडकणार आहेत, असे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.शासकीय विश्रामगृहात त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे प्रदेश सल्लागार आमदार बळीराम सिरस्कार, महासचिव युसूफ पुंजाणी, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे उपस्थित होत्या.हाउसिंग फायनान्स सेक्टरला नॉन बँकिंग फायनान्स सेक्टरने दिलेली ४० हजार कोटींची परतफेड १ नोव्हेंबर रोजी करायची होती, तर ३० नोव्हेंबरपर्यंत एक लाख कोटींची परतफेड करायची आहे; मात्र हाउसिंग फायनान्सकडून ही रक्कम वसूल होणे कठीण झाले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी शेअर मार्केट गडगडणार आहे. तसे झाल्यास देशात आर्थिक अराजकता माजल्याचा पुरावा जगासमोर येणार असल्याचा दावाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. त्यामुळे देश वाचवायचा आहे की बुडवायचा, हे ठरविण्याची वेळ हिंदुत्ववाद्यांवर आली आहे. राम मंदिर, खात्यात १५ लाख देणे, नोटाबंदी या सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने मोदी, फडणवीस यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यातूनच शहरी नक्षलवादाचे भूत उभे केले जात आहे. सनातन्यांकडे बंदुका, बॉम्ब, हत्यारे आढळल्यानंतरही त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.- युती होणे काळाची गरज!भयंकर अवस्थेतून देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षाची युती होणे काळाची गरज आहे. स्थैर्य असलेल्या पक्षांची सत्ता येणे महत्त्वाचे आहे; मात्र युतीच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये होत आहेत. प्रत्यक्षात त्यासाठी काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत चर्चा पोहोचलीच नसल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील