शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोट परिसरात मुलींची विक्री करणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 14:08 IST

अकोट: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून आणून देहव्यापारात ढकलणे तसेच मुलींची परप्रांतात विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे अकोट शहर पोलिसांच्या तपासात उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अकोट: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून आणून देहव्यापारात ढकलणे तसेच मुलींची परप्रांतात विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे अकोट शहर पोलिसांच्या तपासात उघडकीस येण्याची शक्यता आहे. परप्रांतातून पळवून आणलेल्या मुलीचा विक्री प्रयत्न करणाºया दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत अकोट येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.अकोट शहर पोलिसांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेतले असून, तपासामध्ये मुलींची विक्री व देहव्यापारात ढकलणारे मोठे रॅकेट समोर येत आहे. या घटनेतील आरोपींनी आतापर्यंत चार मुलींना फूस लावून पळवून आणून देहव्यापारात ढकलले. शिवाय या मुलींचा गैरफायदा घेऊन या रॅकेटमध्ये सहभागी असणाºयांनी त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतल्याची माहिती पुढे येत आहे. आरोपी मो. सद्दाम शहाबुद्दीन सद्दाम याने यापूर्वीसुद्धा आजमगढ भागातील एका मुलीला लग्नाचे आमिष देऊन पळवुन आणून वेश्या व्यवसायात गुंतवून ठेवले. केवळ परप्रांतातील मुली पळवून आणून त्यांना देहव्यापारात गुंतवून ठेवणे इतपत हे रॅकेट नसून, या रॅकेटमधे सहभागी आरोपींनी अकोट तालुक्यातील दोन मुलींना राजस्थान व मध्य प्रदेशात विक्री केल्याची गंभीर माहिती समोर येत आहे. त्यामुळे देहव्यापारात गुंतलेले फार मोठे रॅकेट अकोट परिसरात असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. विशेषत: अकोट परिसरातच या मुलींची खरेदी-विक्रीचा व्यापार कशा पद्धतीने होतो. व्यापाराकरिता आरोपींनी अकोट शहराचीच निवड का केली असावी, या भागातील किती मुलींची विक्री केली असावी, तसेच या भागात परप्रांतातून जबरदस्तीने किती मुली आणल्या असाव्यात, असा तपासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई करीत आहेत.दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढअकोट शहर पोलीस स्टेशनला ६ जानेवारी रोजी दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये एका १७ वर्षीय मुलीला आरोपी मो. सद्दाम शहाबुद्दीन सद्दाम याने पळवून आणले होते. तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने संबंध प्रस्तापित केले. या प्रकरणी त्याला राजा ऊर्फ राजेश तुळशीराम काळमेघ, आजाद खान ऊर्फ जुनेद खान ऊर्फ जमीर खान, दीपा ऊर्फ रेशमा खान आजाद खान यांनी अमीनपुरा परिसरातील घरात मुक्कामी ठेवण्याकरिता सहकार्य करीत देहव्यापाराकरिता विक्री करण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यापैकी मो. सद्दाम शहाबुद्दीन सद्दाम, आजाद खान ऊर्फ जुनेद खान ऊर्फ जमीर खान या दोघांना अटक करून ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली होती. या दोन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले करून पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली. तसेच सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला असता न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. 

देहव्यापार व मुलींची विक्री प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.- संतोष महल्ले, पोलीस निरीक्षकअकोट शहर पोलीस स्टेशन

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटPoliceपोलिसHuman Traffickingमानवी तस्करी