शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात रब्बी पिके, फळांच्या गुणात्मक दर्जावर परिणामाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:51 IST

अकोला: ढगाळ वातावरण असताना थंडी, विदर्भात असे मागील तीन आठवड्यापासून विचित्र वातावरण तयार झाले असून, याचा रब्बी पिके तसेच फळाच्या अंगीकृत गुणात्मक दर्जावर परिणाम होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ वतरुळात वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण, पण थंडी जोरातयावर्षी विचित्र वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ढगाळ वातावरण असताना थंडी, विदर्भात असे मागील तीन आठवड्यापासून विचित्र वातावरण तयार झाले असून, याचा रब्बी पिके तसेच फळाच्या अंगीकृत गुणात्मक दर्जावर परिणाम होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ वतरुळात वर्तविली जात आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाची पिके हातची गेली,रब्बीतील पिके साथ देतील, अशी अपेक्षा असताना, विदर्भात विचित्र वातावरणाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. एक तर ओलावा नसल्याने पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात ६५ ते ७0 टक्के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. यात सर्वाधिक हरभरा शेतकर्‍यांनी पेरला; पण मागील तीन आठवड्यांपासून या भागात ढगाळ वातावरण आहे. असे असताना थंडीपण आहे. ढगाळ वातावरण असले तर थंडी नसते, असे आजपर्यंतचा अनुभव आहे; परंतु यावर्षी हे वेगळेच वातावरण असल्याचे कृषी शास्त्रज्ञांना वाटते. हिवाळा ऋतूच्या काळात पिके, फळझाडांना दिवसा स्पष्ट सूर्यप्रकाश आणि रात्रीची थंडी असे नैसर्गिक वातावरण हवे असते. तथापि, यावर्षी या वातावरणात विचित्र बदल झालेले दिसतात. त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता असून, किडींचा प्रादुर्भाव तसेच मूलभूत गुणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वातावरणामुळे चांगला प्रकाश मिळत नसल्याने पिके, फळांची अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया कमी होते. फळे लवकर परिपक्व होतात; पण त्याचा आकार लहान होतो; तसेच दर्जा घसरतो.आंबा मोहोरावर माव्याच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते. पेरू  व इतर सर्वच फळे अकाली परिपक्क होतात. हरभरा घाट्यांवर, गहू पिकांच्या ओंब्यावर प्रतिकूल परिणाम होतो. हरभर्‍यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होतो. ज्या ठिकाणी या पिकाला पाणी दिले असेल तेथे विशेष काळजी घेण्याची गरज असते.

वातावरणाचा नवीन प्रकार!यावर्षी ढगाळ वातावरण असताना प्रचंड थंडी हा नवीनच प्रकार अनुभवायला येत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे या वातावरणाचे काय परिणाम होतील, हे आता सांगता येत नसले, तरी त्याचे पुढे काय परिणाम होतील, यावर कृषी शास्त्रज्ञांची नजर आहे.

ढगाळ वातावरणात थंडी, असे नवीनच वातावरण यावर्षी असून, शेतकर्‍यांनी वेळोवेळी रब्बी पिकांचे, फळझाडांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांची पिकांची काळजी घेण्यासाठी हरभरा फुलावर,घाट्यावर आला असेल तर दोन टक्के युरियाची फवारणी करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :agricultureशेती