शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १.७२ लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 15:15 IST

पाऊस सुरूच असल्याने यंदा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

अकोला : यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे; परंतु अवकाळी पाऊस सुरूच असल्याने यंदा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.जिल्ह्यात २०१९-२० यावर्षीच्या रब्बी हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १ लाख ७२ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, गहू, करडी, सूर्यफूल, ज्वारी, मका व इतर रब्बी पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर महिना उलटून गेला; मात्र महिनाभरापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस सुरूच असल्याने, जिल्ह्यात सर्वत्र शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर आणि शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू होण्याची शक्यता आहे.रब्बी पेरणीचे असे आहे नियोजन!रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये हरभरा -१ लाख १५ हजार हेक्टर, गहू -४६ हजार ५८० हेक्टर, रब्बी ज्वार-२०० हेक्टर, रब्बी मका -६२० हेक्टर, करडी-३ हजार ७६० हेक्टर, सूर्यफूल-२ हजार ६५० हेक्टर, कांदा-३ हजार हेक्टर व भाजीपाला-१ हजार हेक्टर इत्यादी पीक पेरणीचा समावेश आहे.अवकाळी पाऊस सुरू असल्याने, शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे थांबली असल्याने, रब्बी पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे. पाऊस थांबल्यास शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसांत रब्बी पिकांची पेरणी सुरू होणार आहे.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी