शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

राज्यात केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:22 IST

अकोला : राज्यात यावर्षी ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आजमितीस ४० टक्के क्षेत्र नापेर आहे. यात सर्वाधिक १३ लाख १३ हजार ९८२ हेक्टरवर हरभरा तर त्या खालोखाल १२ लाख ४६ हजार ५४५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे.

अकोला : राज्यात यावर्षी ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आजमितीस ४० टक्के क्षेत्र नापेर आहे. यात सर्वाधिक १३ लाख १३ हजार ९८२ हेक्टरवर हरभरा तर त्या खालोखाल १२ लाख ४६ हजार ५४५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. पावसाची अनिश्चितता,कमी ओलावा याचा परिणाम पेरणीवर झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर म्हणजेच ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. सद्या रब्बी ज्वारी पिक वाढीच्या,पोटरी ते दाणे भरणेच्या अवस्थेत असून,गहू पीक फुटवे ते आेंबींच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा,बोंडे तर काही ठिकाणी बोंडे परिपक्चतेच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक घाटे धरणे,परिपक्चता तर काही ठिकाणी काढणीला आला आहे. जवस पीक सद्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे.राज्यात गहू ५ लाख ६६ हजार ४४७ हेक्टर,मका १ लाख १५ हजार ५११ हेक्टर, इतर तृण धान्य १२ हजार ५६१ मिळून १९ लाख ४१ हजार ६४ तसेच एकूण रब्बी कडधान्ये मिळून १४ लाख १९ हजार ६५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबिया पिकामध्ये करडई १८००५, जवस ७,६१८,तीळ ४९५,सुर्यफूल ३,५२९ मिळून,इतर तेलबिया ४,८८३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यात हरभरा ६६ टक्के, ज्वारी क्षेत्र ७१ टक्क आहे.दरम्यान, हरभºयावरील घाटेअळीवर नियंत्रण करण्यासाठी ५,८११ गावात सर्वेक्षण करण्यात आले असून, यात ९६ गावात घाटेअळी १८९ गावात मर या किड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी राज्यातील १८ लाख १४ हजार शेतकºयांना कृषी विभागामार्फत एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती