अकोला : राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी अधिकारी एखाद्या गावात मुक्कामी जाऊन, तेथील ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र अधिकार्यांच्या मुक्कामातून खेड्यातील प्रश्न निकाली निघावे, अडचणींवर उपाययोजना करून, खेड्यांचा विकास व्हावा, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चा कार्यक्रमात बुधवारी उमटला. लोकमतच्यावतीने आयोजित या परिचर्चेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार दिनेश गिते, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे, मलकापूरचे सरपंच राजीव वगारे व सांगवी मोहाडीचे उपसरपंच दिनकर वाघ यांनी सहभाग घेतला. राज्याचे मुख्य सचिव ज.स. सहारिया यांनी गत महिन्यात राज्या तील अधिकार्यांची ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्ण घेऊन, जिल्हाधिकार्यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी एखाद्या गावात मुक्कामी जाऊन गावातील लोकांच्या अडचणी, समस्या व तक्रारी जाणून घ्याव्या, आणि त्यावर उ पाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकार्यांसह एसडीओ, तहसीलदार तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी संबंधित गावात जाऊन, तेथील ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला. अधिकार्यांच्या मुक्कामात अडचणींवर केवळ चर्चा न होता, करावयाच्या उपाययोजनांसाठी सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्यासह ग्रामस्थांच्या सहभागाचीही आवश्यकता, त्यामधूनच हा उपक्रम यशस्वी होईल, अशी मते या परिचर्चेतून मांडण्यात आली. एकुणच शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सकारात्मक भूमिका वक्त्यांची दिसून आली.
अधिकार्यांच्या मुक्कामातून निकाली निघावे प्रश्न
By admin | Updated: June 5, 2014 01:32 IST