शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भूमिगतचा ठराव अन् ‘डीपीआर’वर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:16 IST

अकोला : भूमिगत गटार योजनेसाठी तयार केलेल्या ‘डीपीआर’मध्ये त्रुटी असून, ‘एसटीपी’साठी जागा उपलब्ध नसताना स्थायी समितीने घाईघाईत मंजूर केलेल्या ठरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी योजनेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे. याविषयी नगर विकास विभागामार्फत तातडीने बैठक घेऊन हा संभ्रम दूर करण्याची मागणी आ. बाजोरिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

ठळक मुद्दे‘भूमिगत’वर संभ्रमआ. बाजोरियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भूमिगत गटार योजनेसाठी तयार केलेल्या ‘डीपीआर’मध्ये त्रुटी असून, ‘एसटीपी’साठी जागा उपलब्ध नसताना स्थायी समितीने घाईघाईत मंजूर केलेल्या ठरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी योजनेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे. याविषयी नगर विकास विभागामार्फत तातडीने बैठक घेऊन हा संभ्रम दूर करण्याची मागणी आ. बाजोरिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २00७ मध्ये भूमिगत गटार योजना मंजूर झाली होती. त्यावेळी मे. युनिटी कन्सलटन्सीने योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला होता. त्याबदल्यात मनपाने युनिटी कन्सलटन्सीला १ कोटी ६ लाख रुपये देयक अदा केले होते. मजीप्राने याच ‘डीपीआर’ला तांत्रिक मान्यता दिल्याच्या बदल्यात महापालिकेने ६४ लाखांचे देयक अदा केले. तत्पूर्वी शासनाने मंजूर केलेले ५७ कोटी रुपये व्याजासह शासन दरबारी जमा करण्यात आल्याची माहिती आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी पत्रात नमूद केली आहे. सद्यस्थितीत मजीप्राने तयार केलेल्या ‘डीपीआर’मध्ये अनेक त्रुटी आहेत. योजनेंतर्गत प्रशासनाकडे ‘एसटीपी’साठी जागा नसताना निविदा काढण्यात आली. मनपात १३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत ‘डीपीआर’मध्ये अनेक त्रुटी असल्याची सबब पुढे करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेरनिविदा काढण्याची मागणी लावून धरली. त्यानुसार स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर करीत फेरनिविदा काढण्याचे निर्देश दिले. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी स्थायी समितीने फेरनिविदा न काढता भूमिगतचा प्रस्ताव घाईघाईत मंजूर केला. नगर विकास विभागाचे उपसचिव यांच्या पत्राचा दाखला देत स्थायी समितीने हा निर्णय घेतल्यामुळे योजनेबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी नगर विकास विभागाला तातडीने बैठक घेण्याचे निर्देश देण्याची विनंती आ.बाजोरिया यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

न्यायालयाने दिले संकेतमहापालिकेने करवाढ केल्यानंतर आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात करवाढीचा मुद्दा लावून धरला होता. त्यावर विधान परिषदेच्या सभापतींनी शासनाला तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाने करवाढ कमी न केल्यास हायकोर्टाचा मार्ग खुला असल्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली होती. सेनेच्या रेट्यामुळे अखेर भाजपाला करवाढ कमी करावी लागली, हे येथे उल्लेखनीय. आता भूमिगत गटार योजनेत मनपातील सत्ताधारी भाजपाची संशयास्पद भूमिका पाहता शिवसेनेने पुन्हा एकदा कायदेशीर लढाईचे संकेत दिले आहेत. -