शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

‘राणी महल’ पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव

By admin | Updated: March 26, 2017 19:42 IST

पोलीस कल्याण निधीतून अकोल्यात उभारण्यात आलेले राणी महल पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे केले.

पालकमंत्री पाटील यांचे प्रतिपादनअकोला : पोलीस कल्याण निधीतून अकोल्यात उभारण्यात आलेले राणी महल पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या प्रयत्नानेच हे भव्य लॉन्स आज निर्माण झाल्याचा गौरोदगार गृह राज्यमंत्री पाटील यांनी काढले.पंचायत समिती रोडवर उभारण्यात आलेल्या राणी महल पोलीस लॉन्सच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील होते. प्रमुख उपस्थितीत आ. हरीश पिंपळे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी महापौर सुमनताई गावंडे, उज्ज्वला देशमुख, नगरसेवक हरीश अलीमचंदाणी उपस्थित होते.यावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले, की पोलीस खात्याची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राणी महलच्या माध्यमातून भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. यासाठी चंद्रकिशोर मीणा यांचे मोठे योगदान आहे. टीम वर्कमधून काम केल्याने हे शक्य झाले. पोलीस लॉन्सला अंतिम स्वरूप देण्यासाठी सज्जनशक्ती एकत्र आल्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे. पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. अकोलेकरांसाठी लोकाभिमुख काम करण्यात आले असल्याने आनंद वाटत आहे. सामाजिक प्रपंच या राणी महल पोलीस लॉन्समधून भागणार आहे. प्रांगण अंगण यामधून नंदनवन साकारण्यात आले असून, हे कार्य केवळ पोलीस अधीक्षक मीना यांच्यामुळे झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. योग्य नियोजन केल्याने पोलिसांना त्यांच्या हक्काचे आणि अत्यंत माफक दरात वैभव असणारे पोलीस लॉन्स मिळणार असल्याचेही पाटील बोलताना म्हणाले.राज्यातील सर्वात मोठे लॉन्स - मीणाअकोला येथे साकारण्यात आलेले राणी महल पोलीस लॉन्स हे राज्यातील सर्वात मोठे पोलीस लॉन्स असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दिली. पोलीस कल्याण निधीतून हे लॉन्स साकारण्यात आले असून, २0१४ पासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना तीन वर्षांनंतर अंतिम स्वरूप देण्यात आले. यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मोठे परिश्रम घेतले असून, पोलिसांच्या कुटुंबीयांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हे लॉन्स म्हणजे त्यांच्या हक्काचे लॉन्स राहणार आहे.