शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी ‘मॅनेज माय लॉ सुट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:31 IST

आता जिल्हा परिषदेसंदर्भात दाखल सर्व प्रकरणे, त्यांची सद्यस्थिती, बाजू मांडण्यासाठी आवश्यक पूरक माहिती एका क्लिकवर पुढे येणार आहे.

अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अनेक न्यायालयीन प्रकरणांची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडली जात नाही. न्यायालयाचे निकाल विरोधात गेल्यामुळे जिल्हा परिषदांवर नामुश्की येते. ते प्रकार रोखण्यासाठी आता जिल्हा परिषदेसंदर्भात दाखल सर्व प्रकरणे, त्यांची सद्यस्थिती, बाजू मांडण्यासाठी आवश्यक पूरक माहिती एका क्लिकवर पुढे येणार आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये ‘मॅनेज माय लॉ सुट’वर सर्वच विभागांची माहिती अपलोड करणे सुरू झाली आहे.ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व कार्यासन आरमधील न्यायालयीन प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याची तयारी झाली आहे. त्यासाठी ‘मॅनेज माय लॉ सुट’ ही संगणकीय प्रणाली भाडेतत्त्वावर घेण्यात आली. त्यामध्ये ग्रामविकास विभागाविरुद्ध राज्यातील विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांवर देखरेख ठेवली जाणार आहे. सोबतच न्यायालयीन प्रकरणांत पाठपुरावा करण्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर सुनावणी, कागदपत्रांची माहिती मिळणार आहे. संगणकीय प्रणालीमध्ये माहिती अपलोड करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार न्यायालयीन प्रकरणांची माहिती अपलोड करणे सुरू आहे.- प्रकरणातील दंड, जप्ती टाळण्याचाही प्रयत्नजिल्हा परिषद, राज्य शासनाविरुद्ध दाखल प्रकरणांत वेळेतच काही मुद्यांचा खुलासा न झाल्याने दंड, कार्यालयातील वस्तू जप्तीच्या घटनाही घडल्या. या प्रणालीमुळे आता प्रकरणांची अद्ययावत माहितीच अधिकारी-कर्मचाºयासमक्ष राहणार आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत कोणत्या वेळी काय करावे, यावरही अधिकाºयांचे लक्ष राहणार आहे.- पॅनेलवरील वकिलांवरही ‘वॉच’जिल्हा परिषद, शासनाच्या विरोधातील प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पॅनेलवर ठेवलेले वकील विरुद्ध पक्षाशी हातमिळवणी करून त्यांना पूरक भूमिका घेतात. निकाल विरोधात गेल्याने त्याचा फटका जिल्हा परिषद, शासनाला बसतो. त्यामुळे एखाद्या प्रकरणात पॅनेलवर असलेल्या वकिलांची भूमिकाही अधिकाºयांच्या सतर्कतेने बदलता येते. वकील बदलण्याचीही संधी मिळते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदCourtन्यायालय