शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीचा अहवाल पाच महिन्यांपासून दडपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:16 IST

अकोला : नाफेडच्या बाजार समितीतील केंद्रावर शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांची तूर मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. इतर ठिकाणी व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल झाले असताना अकोला केंद्राचा चौकशी अहवाल पाच महिन्यांपासून तयारच झाला नाही. याप्रकरणी चौकशी पथक प्रमुख तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांना जिल्हा उपनिबंधकांनी गेल्या आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावली.

ठळक मुद्देतालुका उपनिबंधक फुपाटे यांच्या पथकाकडून चौकशीचौकशी अधिकारी रजेवर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नाफेडच्या बाजार समितीतील केंद्रावर शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांची तूर मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. इतर ठिकाणी व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल झाले असताना अकोला केंद्राचा चौकशी अहवाल पाच महिन्यांपासून तयारच झाला नाही. याप्रकरणी चौकशी पथक प्रमुख तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांना जिल्हा उपनिबंधकांनी गेल्या आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावली.बाजार समित्यांमध्ये तुरीला पुरेसा भाव नसल्याने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात बाजारात कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या केंद्रात विकण्याचा सपाटाच व्यापारी, दलाल, कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने लावला. संगनमताने हा प्रकार करण्यात आला. या प्रकाराची तक्रार भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली. त्याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात चौकशीसाठी अकोला तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे, सहकार विभागाचे लेखा परीक्षक वीरेंद्र सपकाळ, तालुका लेखा परीक्षक एस.एन. ढोले यांच्या पथकाला जबाबदारी देण्यात आली, तसेच पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे बजावले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी दराने तूर खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनी त्या तुरीचे काय केले, कमी दराने खरेदी करणार्‍यांवर बाजार समितीने कोणती कारवाई केली, नाफेडमध्ये तूर विकणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यातून कोणाला पैसे दिले गेले, याची सखोल तपासणी करण्याचे बजावले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघडपणे कमी दराने तुरीची खरेदी करणार्‍या ८८ व्यापार्‍यांची यादीही तक्रारीसोबत दिली.त्यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतीच कारवाई केलेली नाही. त्याचवेळी तेल्हारा व इतर ठिकाणी कमी भावाने तूर खरेदी करून बाजार समिती केंद्रात चढय़ा भावाने विक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल झाले. अकोल्यातील चौकशी अहवालच तयार नसल्याने पाणी कोठे मुरले, हा विषयच आता स्वतंत्र चौकशीचा झाला आहे. 

चौकशी अधिकारी रजेवरचौकशी पथक प्रमुख सुरेखा फुपाटे जुलै महिन्यापासून रजेवर आहेत. त्याचवेळी त्यांनी चौकशीसंदर्भातील कोणतीही कागदपत्रे कोणाकडे दिली नाहीत. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर चौकशीची फाइल त्यांनी सहकार्‍यांकडे सोपवल्याची माहिती आहे. 

अहवाल न मिळाल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली. चौकशीची फाइल कुणाकडे आहे, याची माहिती घेऊन अहवाल तयार करण्याचे सांगितले आहे. लवकरच तो मिळेल. - जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक अकोला.