शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मूर्तिजापुरात मास्क न घालणाऱ्या २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 19:14 IST

Murtijapur News २५१ जणांवर बुधवारी दंडात्मक कारवाई करुन ५० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

 मूर्तिजापूर : तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होऊन रोज रुग्णाची संख्या वाढत आहे. हा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपविभागीय आधिकारी अभयसिंह मोहिते व नगरपरिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी स्वतः रस्त्यावर येत महसूल, पोलीस व पालिका प्रशासनाच्या समन्वयक सहभागातून २५१ जणांवर बुधवारी दंडात्मक कारवाई करुन ५० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. .           कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असून कोरोना योद्धेच कोरोनाची शिकार ठरत असल्याने पुनश्च  कोरोना संकट गडद होत असल्याचे चिन्हे आहेत, या संकटावर मात करायची असेल, तर नागरिकांनी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन, मास्कचा वापर व गृह विलगीकरणावर गांभीर्याने अंमल करण्याची गरज निर्माण झाली आहे. मास्क न वापरणारांविरुध्द प्रशासनाने आपली मोहिम अधिक तिव्र करीत परीणामी २५१ नागरीकांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले. नागरीकांबरोबच प्रशासनाची जबाबदारी प्रचंड वाढली आहे, ही जबाबदारी विचारात घेऊन मास्क न वापरणारे, फिजिकल डिस्टंसिंग न राखणारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम बुधवार पासून तिव्र करण्यात आली.           तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या प्रकोपाचे गांभीर्य विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करुन मास्क न बांधणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी २९ व बुधवारी १५ अशा ४४ जणांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. १७ जणांवर सध्या येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही नगरसेवकही कोरोना पॉझीटीव्ह आल्यामुळे धास्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य व पालिका प्रशासन कडक मोहीम राबवित आहे. नियमाचा भंग करुन तोंडावर मास्क न लावता मुक्त संचार करणाऱ्यांवर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनात व उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, मुख्याधिकारी विजय लोहकरेव ठाणेदार सचिन यादव यांच्या नियोजनात आज दंडात्मक कारवाई करण्यात आली.            त्यासाठी गठित पथकांपैकी मंडळ अधिकारी महेश नागोलकर, सदानंद देशपांडे, राजेंद्र जाधव, सुनिल डाबेराव, अनिल बेलाडकर, रामराव जाधव, सोनोने, आरोग्यशानिरिक्षक विजय लकडे यांच्या नेतृत्वातील पथकांनी मास्क न घालणाऱ्या २५१ लोकांकडून ५० हजार २०० रुपये दंड वसूल केला. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला