शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे केले; पण बियाण्याची मिळाली नाही रक्कम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 16:20 IST

शेतकºयांच्या खात्यात बियाण्याची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विविध जिल्ह्यांत पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाच्या पथकांनी पंचनामे केले. त्यानुसार सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकऱ्यांना बियाण्याची रक्कम देण्याची प्रक्रिया ‘महाबीज’मार्फत सुरू करण्यात आली असली; तरी खासगी बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्याची रक्कम शेतकºयांना देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांच्या खात्यात बियाण्याची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणीनंतर अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून कृषी विभागाकडे करण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाच्या तालुकास्तरीय पथकांमार्फत सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या शेतांमध्ये पंचनामे करण्यात आले असून, पंचनाम्यांच्या प्रती संबंधित बियाणे कंपनींकडे देण्यात आल्या. त्यानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाण्याची रक्कम देण्याची प्रक्रिया ‘महाबीज’ मार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये काही शेतकºयांच्या बँक खात्यात बियाण्याची रक्कम जमा करण्यात आली असली तरी, बहुतांश शेतकºयांना अद्याप बियाण्याची रक्कम मिळाली नाही.सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाण्याची रक्कम देण्याची प्रक्रिया ‘महाबीज’कडून सुरू करण्यात आली असली तरी, खासगी बियाणे कंपन्यांचे बियाणे घेतलेल्या शेतकºयांना सोयाबीन बियाण्याची रक्कम देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे बियाण्याची रक्कम संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकºयांना केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२२ एकर शेतात पेरलेले महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. तसेच २० एकर क्षेत्रावर पेरलेले खासगी कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. यासंदर्भात कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले; परंतु संबंधित बियाणे कंपन्यांकडून बियाण्याची रक्कम अद्याप मिळाली नाही.-विजय चतरकरशेतकरी, कापशी, ता. अकोला.

कृषी विभागाकडून प्राप्त पंचनाम्यानुसार, पडताळणी करून सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात बियाण्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.-अनिल भंडारीव्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.

सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांच्या शेतांमधील पंचनामे करण्यात आले असून, पंचनाम्यांच्या प्रती संबंधित बियाणे कंपनींकडे देण्यात आल्या आहेत.-मोहन वाघजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र