शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Terror Attack : अकोल्यात पाकिस्तान व दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 15:12 IST

अकोला : जम्मू-काश्मीरातीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर मोठा जनक्षोभ उसळला आहे. या घटनेचा अकोल्यात शुक्रवारी राजकीय पक्ष व विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.

अकोला : जम्मू-काश्मीरातीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर मोठा जनक्षोभ उसळला आहे. या घटनेचा अकोल्यात शुक्रवारी राजकीय पक्ष व विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शिवसेनेच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४४ जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध म्हणून अकोला येथे महात्मा गांधी चौकात आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी निदर्शने केली. त्यानंतर हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या चौकात दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली.

अभाविप ने जाळला पाकचा राष्ट्रध्वजअखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी मदनलाल धिंग्रा चौकात एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आला. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. सायंकाळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPakistanपाकिस्तान