शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:21 IST

राज्यात रखडलेले वाळू घाटांचे लिलाव होणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाळू घाटांचे लिलाव करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सुनावणी घेणे बंधनकारक आहे; मात्र राज्यातील एकाही जिल्ह्यात अद्याप जनसुनावणी घेण्यात आली नाही. जनसुनावणीची प्रक्रिया प्रलंबित असल्याने, राज्यात रखडलेले वाळू घाटांचे लिलाव होणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील वाळू धोरण शासनामार्फत गत ३ सप्टेंबर २०१९ रोजी निश्चित करण्यात आले. त्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी, उन्हाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून जात असताना राज्यात वाळू घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया अद्यापही मार्गी लागली नाही. राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीच्या निर्देशानुसार वाळू घाटांचे लिलाव करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत जनसुनावणी घेणे आवश्यक आहे; परंतु राज्यातील एकाही जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावासाठी अद्याप जनसुनावणी घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात रखडलेले वाळू घाटांचे लिलाव होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जनसुनावणीची अशी आहे प्रक्रिया!वाळू घाटांचा लिलाव करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वाळू घाटांच्या लिलावासंदर्भात जनसुनावणी घेण्यात येते. त्यामध्ये वाळू घाटांमधील वाळूचे उत्खनन, वाहतूक आणि लिलावासंदर्भात संबंधित परिसरातील नागरिकांच्या हरकती व आक्षेपांवर जनसुनावणी घेण्यात येते.

जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे. जनसुनावणी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाळू घाटांचा लिलाव करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग