शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक मंचाद्वारे शेतकरी मेळाव्यात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:46 IST

सामाजिक क्षेत्रात जनजागृती एक  चळवळ, या भूमिकेतून स्थापन झालेल्या सत्यशोधक  मंचाच्या शाखेची स्थापना खिरपुरी येथे झाल्याची  घोषणा शेतकरी मेळाव्यामध्ये मंचाचे केंद्रीय समिती  संयोजक डॉ. राजेश तायडे यांनी केली. पावसाचे  चुकलेले गणित व त्यामुळे पिकांवर झालेला विविध  किडींचा प्रादुर्भाव, शासनाने जाहीर केलेल्या  पीककर्ज माफीबद्दलच्या माहितीचा अभाव तसेच  म.फुले जीवनदायी आरोग्य योजनेबाबत जनजागृती  निर्माण करण्याचे हेतूने खिरपुरी येथे रविवार, ३ स प्टेंबर रोजी शेतकरी मार्गदर्शन मेळावा पार पडला.

ठळक मुद्देखिरपुरी येथे सत्यशोधक मंचाची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सामाजिक क्षेत्रात जनजागृती एक  चळवळ, या भूमिकेतून स्थापन झालेल्या सत्यशोधक  मंचाच्या शाखेची स्थापना खिरपुरी येथे झाल्याची  घोषणा शेतकरी मेळाव्यामध्ये मंचाचे केंद्रीय समिती  संयोजक डॉ. राजेश तायडे यांनी केली. पावसाचे  चुकलेले गणित व त्यामुळे पिकांवर झालेला विविध  किडींचा प्रादुर्भाव, शासनाने जाहीर केलेल्या  पीककर्ज माफीबद्दलच्या माहितीचा अभाव तसेच  म.फुले जीवनदायी आरोग्य योजनेबाबत जनजागृती  निर्माण करण्याचे हेतूने खिरपुरी येथे रविवार, ३ स प्टेंबर रोजी शेतकरी मार्गदर्शन मेळावा पार पडला.बळीराजासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात  आले असल्याची माहिती रवी मसने यांनी मेळाव्याचे  प्रास्ताविकात दिली.शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज  पीककर्ज माफी योजनेबद्दल श्रीकांत खाडे, सहकार  अधिकारी यांनी पीककर्ज माफीसाठीची पात्रता,  निकष, प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याविषयी विस् तृत मार्गदर्शन केले. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांना  उत्तरे दिली. म. फुले जीवनदायी आरोग्य योजनेमधील  विविध आजार, त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया,  आवश्यक माहिती, प्रक्रिया याबाबत जिल्हा वैद्यकीय  अधिकारी डॉ. श्रीकांत टेकाडे व डॉ. विनायक चकोर  यांनी मार्गदर्शन करून, शंका समाधान केले.  पंजाबराव कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ गहू संशोधक  नीलकंठ पोटदुखे यांनी गहू पिकाबद्दल माहिती आ पल्या अध्यक्षीय भाषणात दिली. कार्यक्रमाला अध्यक्ष  म्हणून सरपंच मनोरमा सिरसाट यांनी मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमात सत्यशोधक मंचाच्या खिरपुरी  शाखेच्या प्रथम पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा पार  पडला. अध्यक्ष महेंद्र जढाळ, उपाध्यक्ष सोमेश्‍वर  कवळकार, सचिव दत्तात्रय जामोदकार, सहसचिव  नितीन मसने, तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून  सखाराम वरणकार, विलास दांदळे, अनंता गणोरकार  यांच्या नावांची घोषणा मंचाचे संस्थापक डॉ. प्रवीण  लोखंडे यांनी केली.मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उमरी शाखेचे अध्यक्ष  गजानन धामणकर, अजय चिंचोलकार, प्रचारक  मंगेश गणोरकार, सत्यशोधक सतीश मसने, मधुसुदन  धनोकार, महेंद्र दिंडोकार, दीपक आसोलकार, पवन  ढेंगे आदी मान्यवर उपस्थित होते.