बुलडाणा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कायर्कारिणीची दोन दिवसीय विस्तारित बैठक आणि ह्यमनोविकारांचा मागोवाह्ण हे शिबिर येत्या २३, २४ आणि २५ मार्च रोजी बुलडाणा येथे होत आहे. यावेळी राज्यातील कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राजीव गांधी सैनिक शाळेत होणार्या या बैठकीसाठी ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे, अंनिसचे राज्य संघटक दिलीप सोलंके, केंद्रीय सल्लागार अँड. गणेश हलकारे, राज्य सह संघटक अशोक घाटे, प्रदेश प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे पाटील, राज्य सल्लागार शरद वानखडे, विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे, राज्य महिला संघटक छायाताई सावरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. २३ ला सकाळी १0 वाजता या शिबिराला प्रारंभ होणार असून, यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. बाहेकर मार्गदर्शन करतील. दुपारी सैलानी यात्रेत जादूटोणाविरोधी कायद्याबाबत प्रबोधन करतील . २४ मार्च रोजी सकाळी राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. यामध्ये सन २0२0 पर्यंतचे नियोजन ठरवले जाणार आहे. याच कार्यक्रमात ह्यसर्मपित कार्यकर्ताह्ण पुरस्काराने राज्यातील २५ जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना सन्मानित केले जाणार आहे. या तीन दिवसांत संघटन विस्तार, विद्यार्थी, युवा शाखा निर्मिती, तालुका प्रबोधन यात्रा, विवेक निधी संकलन तसेच सखोल प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आदी विषयांवर चर्चा करून समाजातील विविध पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना संघटनेत सामील करून घेतले जाईल, अशी माहिती जिल्हा आयोजन समितीचे प्रतिभा भुतेकर, प्रमोद टाले, दत्ता सिरसाठ, शिवाजी पाटील यांनी दिली.
‘मनोविकारांचा मागोवा’ राज्यस्तरीय शिबिर
By admin | Updated: March 21, 2016 01:38 IST