शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण मूल्यांकन समितीच्या मान्यतेसाठी रखडले वाळू घाटांचे प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:05 IST

राज्यात वाळू घाटांच्या लिलावाची रेंगाळलेली प्रक्रिया मार्गी लागणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर

अकोला : राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावासाठी राज्य पर्यावरण समितीची मान्यता घेण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. पर्यावरण मूल्यांकन समितीच्या मान्यतेसाठी वाळू घाटांचे प्रस्ताव रखडल्याने, राज्यात वाळू घाटांच्या लिलावाची रेंगाळलेली प्रक्रिया मार्गी लागणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील वाळू धोरण शासनामार्फत ३ सप्टेंबर २०१९ रोजी निश्चित करण्यात आले असून, त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. वाळू घाटांच्या लिलावासाठी पावसाळा पश्चात वाळू घाटांचे सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी; यावर्षीचा उन्हाळा सुरु होरून महिनाभराचा कालावधी होत असताना राज्यातील एकाही जिल्ह्यात अद्याप वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले नाही. वाळू घाटांचा लिलाव करण्यासाठी राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे; परंतु राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीची मान्यता घेण्यासाठी राज्यातील एकाही जिल्ह्यातून अद्याप वाळू घाटांचे प्रस्ताव सादर करण्यात आले नाही. राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीकडून मान्यता प्राप्त करण्यासाठी वाळू घाटांचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया रखडल्याने, राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिावाची प्रक्रिया रेंगाळली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावाची प्रकिया मार्गी लागणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पर्यावरण व्यवस्थापन, खाणकाम आराखडा तयार करण्याचे काम सुरू!राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीच्या मान्यतेसाठी वाळू घाटांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल, पर्यावरण व्यवस्थापन आराखडा, जिल्हा सर्वेक्षण अहवाल आणि खाणकाम आराखडा तयार करण्याचे काम सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यासह सर्वच जिल्ह्यात खनिकर्म विभागामार्फत सुरू आहे.वाळू टंचाईत रखडली बांधकामे!वाळू घाटांचे लिलाव अद्याप करण्यात आले नसल्याने, निर्माण झालेल्या वाळू टंचाईच्या परिस्थितीत राज्यात घरकुल योजनेतील घरकुलांसह इतर शासकीय बांधकामे आणि खासगी इमारतींची बांधकामे रखडली आहेत.जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीच्या मान्यतेसाठी वाळू घाटांचे प्रस्ताव सादर करण्याकरिता पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल, जिल्हा सर्वेक्षण अहवाल, पर्यावरण व्यवस्थापन आराखडा व खाणकाम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- डॉ. अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू