शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेचा अत्याधुनिक स्वच्छतागृहांसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:41 IST

अकोला : बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याची गरज ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने दहा जागांचा प्रस्ताव तयार केला.

ठळक मुद्देमनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली. परंतु, सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्याठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे.स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर विजय अग्रवाल यांनी स्वत: हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला.

अकोला : बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याची गरज ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. महापौर विजय अग्रवाल यांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर केला असून, त्याला मंजुरी मिळताच आणखी दहा जागांचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसह प्रशासकीय कामकाजानिमित्त बाहेरगावच्या नागरिकांची सतत वर्दळ असते. शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे नागरिक नाईलाजाने उघड्यावर कार्यभाग आटोपत असल्याचे दिसून येते.शहराच्या मध्यभागी मुख्य बाजारपेठ वसली असून, साहजिकच पुरुष आणि महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी या भागात स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था क्रमप्राप्त ठरते. सद्यस्थितीत बोटावर मोजता येणाºया परंतु दृष्टीस न पडणाºया स्वच्छतागृहांमुळे नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत वर्षी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली. परंतु, सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्याठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नागरिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी पुढाकार घेत मुख्य बाजारपेठसह शहराच्या इतरही भागात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. या विभागाने पहिल्या टप्प्यात दहा जागा निश्चित केल्या आहेत. जिल्हाधिकाºयांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर विजय अग्रवाल यांनी स्वत: हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला.स्वच्छतेचा मागमूस नाही!मनपाच्यावतीने यापूर्वी ‘बीओटी’ तत्त्वावर पंचायत समितीलगत, सिंधी कॅम्पस्थित मनपा कार्यालय परिसर, जनता भाजी बाजार, सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह अगदी बोटावर मोजता येणारे सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले. या ठिकाणी नागरिकांजवळून शुल्क वसूल केले जात असले, तरी स्वच्छतेचा मागमूसही दिसत नसल्याने नागरिकांनी अशा घाणेरड्या स्वच्छतागृहांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. साफसफाईचा अभाव असणाºया स्वच्छतागृहांची मान्यता रद्द करून दुसºया संस्थांना देण्याची गरज आहे.

आझाद कॉम्प्लेक्सच्या मागे नाल्यावर बांधकामशहरात सर्वाधिक वर्दळ गांधी रोडवर राहते. याठिकाणी एकही स्वच्छतागृह नसल्याने खरेदीसाठी येणाºया पुरुष व महिलांची चांगलीच कुचंबणा होते. गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्सच्या मागे चक्क मोठ्या नाल्यावर अनधिकृतरीत्या बांधकाम करून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ही जागा स्वच्छतागृहासाठी सोईस्कर असल्याने आयुक्त जितेंद्र वाघ यांनी परिसराची पाहणी करण्याची गरज आहे.

जिल्हाधिकाºयांकडे दहा जागांचा प्रस्ताव सादर केला असून, त्याला मंजुरी मिळताच आणखी दहा ठिकाणी ‘पे अ‍ॅन्ड यूज’ तत्त्वावर स्वच्छतागृह बांधल्या जातील.-विजय अग्रवाल, महापौर

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय