शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साजीद खान पठाण यांच्याविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:55 IST

अकोला: महापालिकेतील काँग्रेसचे गटनेता तथा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्यासोबतच त्यांना पुरविण्यात आलेल्या सर्व सोयी-सुविधा काढून घेण्याचा प्रस्ताव विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

अकोला: महापालिकेतील काँग्रेसचे गटनेता तथा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्यासोबतच त्यांना पुरविण्यात आलेल्या सर्व सोयी-सुविधा काढून घेण्याचा प्रस्ताव विशेष सभेत मंजूर करण्यात आला. महापौर विजय अग्रवाल यांच्या सूचनेनुसार मतदान घेण्यात आले असता साजीद खान यांच्या समर्थनार्थ ८० नगरसेवकांपैकी १८ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. या मतदान प्रक्रियेवर काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला आहे.महापालिकेच्या सभागृहात गदारोळ घातल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव ५ नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या विरोधात सभागृहात तीन चतुर्थांश मतदान होणे गरजेचे आहे. मंजूर प्रस्तावावर अपात्रतेची कार्यवाही व्हावी, यासाठी भाजपने गुरुवारी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. हा विषय पटलावर येताच काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होणे गरजेचे आहे. सभागृहात अनेकदा नगरसेवक संतप्त होतात, माईकची फेकाफेक होते. ५ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेत घडलेल्या प्रकाराबद्दल साजीद खान यांनी सभागृहाची माफी मागितली आहे. त्यामुळे महापौरांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती डॉ. जिशान हुसेन यांनी केली. सत्ताधाऱ्यांना हा विषय घ्यायचा असेल, तर त्यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार तीन महिन्यांच्या आत प्रस्तावात फेरबदल करता येत नाही. हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नाही. मतदानासाठी तीन चतुर्थांश (८० पैकी ६१ सदस्य) नगरसेवकांनी मतदान करणे अपेक्षित असून, याप्रकरणी पुनर्विचार व्हावा, अशी विनंती डॉ. हुसेन यांनी महापौरांना केली. यावेळी काँग्रेस नगरसेवक अ‍ॅड. इक्बाल सिद्दिकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, फैय्याज खान, भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव व किरण बोराखडे यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका