शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

सवलतीच्या गुणांसाठी प्रस्तावास मुदतवाढीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:32 PM

अकोला : इयत्ता दहावीसाठी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त वाढीव गुण मिळण्यासाठी विभागीय बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याला मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने शिक्षण विभागाकडे केली आहे.

अकोला : इयत्ता दहावीसाठी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त वाढीव गुण मिळण्यासाठी विभागीय बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याला मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने शिक्षण विभागाकडे केली आहे.शिक्षण विभागाच्या विविध विभागीय मंडळांनी प्रस्ताव सादर करण्यासाठी वेगवेगळी तारीख दिलेली आहे. काही मंडळांत २१ जानेवारी, काही ठिकाणी १५ जानेवारी ही तारीख दिली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०१८ च्या चित्रकला (ड्रॉइंग) ग्रेड परीक्षेचा निकाल कला संचालनालय, मुंबई यांच्याकडून १४ जानेवारी रोजी जाहीर केल्या जात आहे. या परिस्थितीत काही केंद्रांपर्यंत पोस्टाने पाठविलेले निकाल पत्रक पोहोचू शकत नाहीत. त्यानंतर केंद्र प्रमुखांना सहभागी शाळांना निकाल कॉपी करून पाठवायचा असतो. त्यासाठी निदान दोन-तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामध्ये सध्या दहावीत शिकत असलेले विद्यार्थी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेला बसलेले आहेत. त्यांनी मागील वर्षी इयत्ता नववीत असताना एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता त्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य कलाध्यापक संघ महामंडळ राज्याध्यक्ष पी. आर. पाटील, सचिव एम. ए. कादरी व प्रसिद्धिप्रमुख किशोर आंबेकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण