शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिंजर येथील शामकी माता शाळेची मान्यता रद्दचा प्रस्ताव; शिक्षण विभागाकडून होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:56 IST

अकोला : विविध शैक्षणिक बाबींमध्ये प्रचंड घोळ केल्याप्रकरणी पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळेची मान्यता रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशाळेची मान्यता रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाला पाठविला आहे. शामकी माता मराठी प्राथमिक शाळेतील प्रचंड घोळाच्या तक्रारी सातत्याने करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याने मान्यता रद्दचा प्रस्ताव जानेवारीअखेर पाठविला आहे.

अकोला : विविध शैक्षणिक बाबींमध्ये प्रचंड घोळ केल्याप्रकरणी पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळेची मान्यता रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन-तीन वर्षांत पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळेतील प्रचंड घोळाच्या तक्रारी सातत्याने करण्यात आल्या. त्यानंतरही कारवाई न झाल्याने तक्रारकर्ते तारासिंग उकाराम राठोड, प्रवीण चव्हाण यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तार अधिकाºयांनी पुन्हा केलेल्या चौकशीचा अहवाल २४ एप्रिल २०१७ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना सादर करण्यात आला. त्यावरून शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी २७ एप्रिल रोजी शामकी माता प्राथमिक मराठी शाळेची मान्यता रद्द करण्याची नोटीस बजावली. त्यानंतर प्रतिभा शिक्षण संस्थेचे प्रा. मधुकर पवार यांच्याकडून कोणतेच स्पष्टीकरण शिक्षण विभागाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला शिक्षणाधिकाºयांनी पुन्हा नोटीस बजावली. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडून शाळेची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याने मान्यता रद्दचा प्रस्ताव जानेवारीअखेर पाठविला आहे.

- चौकशीमध्ये पुढे आलेला घोळपद रिक्त नसताना शासन नियमांची पायमल्ली करून प्रवीण गणेश चव्हाण यांची संस्था सचिव किसन पवार यांनी नियमबाह्यपणे केलेली नियुक्ती, शाळेत अनुपस्थित असताना शिक्षक डी.के. गिºहे यांना सेवेतून कमी न करता केवळ डी.एड. पूर्ण करण्यासाठी ठेवले. आरटीई अ‍ॅक्टनुसार शाळेत किमान भौतिक सुविधाही उपलब्ध नाहीत. पी.सी. राठोड यांनाही डी.एड. करण्यापुरते सेवेत ठेवून काढून टाकले. त्यांची नियुक्ती अन्यायकारकपणे रद्द करून त्यांच्या जागेवर छाया पवार यांना नियुक्ती देण्यात आली. कामकाजाचे दस्तावेज अद्ययावत नाहीत. वैयक्तिक न्यायालयीन प्रकरणात उपस्थित राहण्यासाठी रजा न टाकता हजेरी पुस्तकात त्याबाबत न्यायालयीन प्रकरण अशी नोंद करणे, २०१२-१३ ते २०१५-१६ पर्यंतच्या दाखल खारीजमध्ये प्रवेश घेणे, रद्द करणे यावरून विद्यार्थी प्रवेश खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. शाळेतील चारही शिक्षकांमध्ये सातत्याने वाद असल्याने संस्थेतील कामकाज सुरळीत न ठेवणे, यासोबतच मूळ दस्तावेज बदलणे, खोटे विद्यार्थी प्रवेश दाखविणे, नियमित शिक्षकांचे वेतन न काढणे, आॅनलाइन माहिती खोटी दाखल करणे, शिक्षकांचा मानसिक, शारीरिक छळ करणे, अपमानास्पद वागणूक देणे, खंडणीची मागणी करणे, या बाबी पाहता शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर झाला आहे.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणzp schoolजिल्हा परिषद शाळा