शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळासाठी १ हजार कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:48 IST

अकोला: मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळासाठी शासनाकडे १ हजार कोटींची मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करीत राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आझम यांनी दिली.

अकोला: मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळासाठी शासनाकडे १ हजार कोटींची मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करीत राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आझम यांनी दिली.स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आझम यांनी महामंडळाच्या कार्याची माहिती देत त्यांच्या कार्यकाळात महामंडळाच्या विविध योजनांमध्ये सुसूत्रता आणल्याचे स्पष्ट केले. सन २००० साली स्थापन झालेल्या या महामंडळासाठी शासनाने ५०० कोटींची तरतूद केली होती. गेल्या १८ वर्षात केवळ ३०० कोटी देण्यात आले असून, भाजपाच्या कार्यकाळात १२५ कोटीचा सर्वाधिक निधी देण्यात आला. अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे महामंडळ कार्यरत असून, विविध योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. महामंडळाची कार्यप्रणाली गतिमान झाली असून, उर्वरित ७५ कोटींचा निधीसुद्धा लवकरच प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. वाढती लोकसंख्या व लोकांची गरज लक्षात घेत महामंडळाला आणखी निधीची गरज असून, या महामंडळाला १ हजार कोटी देण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अहमद राणा, मोबीन सिद्दिकी, चांद खा आदी उपस्थित होते.

शैक्षणिक कर्ज वाटपात आघाडीवरमौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचा लाभ मुस्लीम, शीख, जैन, पारसी, ख्रिश्चन अशा धर्मातील बांधवांना मिळत असून, शैक्षणिक कर्ज वाटपामध्ये महामंडळ अग्रेसर असल्याचे आझाद यांनी सांगितले. राज्यभरात आतापर्यंत २८ कोटी ३६ लाख ७६ हजार ९०० रुपयांचे शैक्षणिक कर्ज वाटप केले असून, त्यामध्ये अकोल्यातील ५७, अमरावतीे १६, बुलडाणा ६७, वाशिम ९, यवतमाळच्या ४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लवकरच ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कर्जमौलाना महामंडळाने कर्ज वाटपात अनेक बदल केले असून, आता लवकरच वाहतूक व्यवसायासाठीही कर्ज वाटप केले जाणार असल्याचे आझाद यांनी सांगितले. सध्या व्यावसायिक कर्जाची असलेली मर्यादाही वाढविणार असल्याने त्याचा लाभ अनेकांना घेता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मुस्लिमांना खूश करण्याचा प्रकार नाहीभाजपा सेनेची सत्ता आल्यानंतर चार वर्षानंतर आता मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाला अध्यक्षपद दिले हा मुस्लीम समाजाला खूश करण्याचा प्रकार आहे आहे का, असे विचारले असता यापूर्वी महामंडळाला अध्यक्षपद का दिले नाही, याचा विचार केल्यापेक्षा आता मिळालेल्या कार्यकाळात किती काम करता येईल, यावर माझा भर असल्याचे आझाद म्हणाले.

मुस्लीम बांधवांसोबतच इतर अल्पसंख्याक समाजानेही या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची गरज आहे. शीख, पारशी, खिश्चन बांधवांचा ओढा या महामंडळाकडे कमी आहे. त्यामुळेच अकोल्यातील गुरुद्वाराला भेट देऊन मी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणांसाठी महामंडळाच्या कर्जाच्या सुविधांचा लाभ घ्यावा.- हाजी हैदर आझम

 

टॅग्स :Akolaअकोला