शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक पदावरील पदोन्नती रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:14 IST

नागपूर खंडपीठाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाने याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सहयोगी प्राध्यापक या पदावरील पदोन्नती देताना निकषाचे पालन केले नाही, असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच प्राध्यापकांच्या पदोन्नत्या रद्दबातल ठरविल्या. नागपूर खंडपीठाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाने याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि विनय जोशी यांच्या खंडपीठाने गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. मनीष देशमुख, डॉ. संजय काकडे आणि डॉ. विनोद खडसे व अन्य एक अशा पाच प्राध्यापकांनी याप्रकरणी तीन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. पदोन्नत्या देताना महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ व महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिनियम १९९० च्या ७७ व्या परिनियमात पदोन्नतीची पदे ही न्यूनतम पात्रता व अनुभवधारकांमधून मेरिट व सेवाज्येष्ठतेच्या आधारे निवड समितीच्या शिफारशीनुसार भरण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे; परंतु ७ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या बैठकीत वेळेवरचा विषय म्हणून प्रशासनाने परिनियम डावलून पदोन्नती प्रक्रिया बदलण्याचा नियम करून घेतला. तसेच कार्यकारी परिषदेच्या ठरावामुळे लागू केलेल्या नवीन नियमाला परिनियमात दाखवून मेरिटला (गुणवत्ता) वगळून केवळ न्यूनतम पात्रता व सेवाज्येष्ठतेद्वारे पदोन्नती देण्याचा नियम करण्यात आला. तसेच सभेचे इतिवृत्त कायम न करता ७ जानेवारी २०१९ रोजी या नवीन नियमाने प्रस्ताव मागविण्यात आले. हा नवीन नियम केल्यावर तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून २५ जानेवारी २०१८ या तारखेपासून पदोन्नत्या देण्यात आल्या, असा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला होता.१ जून २०१९ रोजी झालेल्या विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सभेत ७ जानेवारी २०१९ रोजी पारित केलेला ठराव कायम करण्याकरिता ठेवण्यात आला; परंतु परिनियमात बदल करून नियम लागू करण्याचे अधिकार राज्यपाल यांनाच आहेत. त्यामुळे कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी पदोन्नतीची प्रक्रिया बदलण्याच्या नियमाबाबतच्या ठरावावर आक्षेप घेतला. हा विषय चर्चेसाठी न ठेवता तसेच राज्यपालांच्या परवानगीशिवाय घाई करीत ठराव पारित केला, असेही याचिकेत नमूद करण्यात आले. त्यामुळे पाच प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक पदावर केलेली पदोन्नती बेकायदेशीर असल्याने ती रद्द करावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. पदोन्नतीचे निकष बदलले गेल्याने याचिकाकर्त्यांचा घटनात्मक हक्क हिरावला गेला, असे आदेशात नमूद आहे.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ