अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरू आहेत. यामध्ये प्रवेश देण्यासाठी राज्यातील ८ ते १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींची क्रीडा नैपुण्य चाचणी घेण्यात येणार आहे.
अकोला जिल्ात ७ जुलैपासून शाळा स्तरावर क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन केले आहे. सन २०१४-१५ करिता विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये नवीन प्रवेश देण्यासाठी शाळेत शिकत असलेले तसेच शाळेत शिकत नसलेल्या; परंतु उत्कृष्ट शारीरिक क्षमता असलेल्या मुला-मुलींची क्रीडा नैपुण्य चाचणी घेण्यात येईल. यामध्ये वजन, उंची, ३० मी. धावणे, ८०० मी. धावणे, ६ बाय १० शटल रन, उभे राहून लांबउडी, उभे राहून उंचउडी, मेडिसीन बॉल थ्रो, लवचिकता या नऊ चाचण्या द्याव्या लागतील. अकोला जिल्ह्यातील सर्व शाळा, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग अंतर्गत येणार्या आश्रम शाळा, वसतिगृह, समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणार्या शाळेतही चाचणी घेण्यात येईल. जिल्हा स्तरावर नऊ चाचण्यामध्ये १७ किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे खेळाडूंना आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई क्रीडांगण येथे संपर्क साधावा. शाळा स्तरावर ७ जुलै रोजी आयोजन होईल. १५ जुलै रोजी मूर्तिजापूर, आकोट, तेल्हारा, १६ जुलै बाळापूर, पातूर, १७ जुलै बार्शीटाकळी, अकोला तालुका स्तर व १८ जुलै रोजी अकोला मनपा स्तर चाचणी घेण्यात येईल. जिल्हा स्तर चाचणी २५ जुलै रोजी होईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी दिली.