शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘पणन’ने केली ४७ लाख विक्रमी कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:19 IST

पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर खरेदीसाठी शेकडो ट्रॅक्टर कापूस उभे आहेत.

अकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी आतापर्यंत ४७ लाख क्ंिवटल विक्रमी कापूस खरेदी केला असून, कोरोना व्हायरसचा परिणाम भारतीय कापूस बाजारावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने भाविष्यात दर वाढतील की नाही, या अनिश्चिततेमुळे बाजारात कापसाची आवक वाढली आहे. पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर खरेदीसाठी शेकडो ट्रॅक्टर कापूस उभे आहेत.पणन महासंघाने आतापर्यंत विदर्भात १५ लाख तर उर्वरित राज्यात ३२ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी केली आहे. हमीदर बऱ्यापैकी असून, बाजारातही सरासरी प्रतिक्ंिवटल ५,३५० रुपये दर आहेत. कोरोना व्हायरसमुळे चीनला होणारी कापसाची निर्यात थांबली आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढतील की नाही, ही अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला आहे. ‘पणन’च्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी या एकाच खरेदी केंद्रावर दररोज ३ हजार क्विंटल कापसाची आवक सुरू आहे. शेतकºयांनी गतवर्षी साठवून ठेवलेला कापूसदेखील विक्रीला काढला आहे. खरेदी यंत्रणा अपुरी पडत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील आणि खरेदी केंद्रावर ३०० च्यावर ट्रॅक्टर कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. लेहगाव, अमरावती केंद्रावर २०० ट्रॅक्टरसह राज्यातील इतरही खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत.यावर्षी पणन महासंघाकडे कापूस विकण्यासाठी शेतकºयांचा कल वाढला आहे. गत पाच वर्षांत ही विक्रमी कापूस खरेदी करण्यात आली आहे. शेतकºयांनी गतवर्षी साठवून ठेवलेला कापूस विक्रीला काढला आहे. काही खरेदी केंद्रावर यावर्षीचा कापूस आता हलक्या प्रतीचा येत असल्याचे पणनच्या अधिकाºयांनी सांगितले.

यावर्षी आतापर्यंत ४७ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, आणखी आवक सुरू आहे. काही खरेदी केंद्रावर ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. खरेदी मात्र जोरात सुरू आहे.- अनंतराव देशमुख,अध्यक्ष,म. रा. सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस