अकोला: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ८ मार्च रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येते. रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शहरातील राजराजेश्वर मंदिरात पूजा करून मिरवुणकीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जयहिंद चौक, सिटी कोतवाली, कपडा मार्केट, गांधी चौक मार्गे मिरवूणक मदनलाल धिंग्रा चौकात पोहोचली. या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, उपमहापौर विनोद मापारी, उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, सेवकराम ताथोड, तालुकाप्रमुख मुकेश मुरूमकार, शहरप्रमुख तरुण बगेरे, जिल्हा सचिव धनंजय गावंडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती. मदनलाल धिंग्रा चौकात झालेल्या सभेत श्रीरंग पिंजरकर यांनी सभेला संबोधित केले. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन समाजसेवा करण्याचे आवाहन पिंजरकर यांनी यावेळी केले.
शिवजयंतीनिमित्त मिरवणूक
By admin | Updated: March 9, 2015 01:53 IST