शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
3
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
4
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
5
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
6
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
7
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
8
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
9
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
10
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
11
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
12
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
13
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
14
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
15
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
16
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
17
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
18
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
19
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
20
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन

शिक्षक समायोजनाची  प्रक्रिया दोन दिवसांत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:28 AM

अकोला : जिल्हय़ातील ५२ शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या यादीला पुणे शिक्षण आयुक्तांनी मान्यता दिली असून, येत्या दोन दिवसांमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. मंगळवारी उशिरा सायंकाळी शिक्षणाधिकार्‍यांनी ७१ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित केली आहे. ही पाहण्यासाठी शिक्षक गर्दी करीत आहेत. 

ठळक मुद्दे७१ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशितशिक्षकांच्या हरकती ऐकून घेणार! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील ५२ शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या यादीला पुणे शिक्षण आयुक्तांनी मान्यता दिली असून, येत्या दोन दिवसांमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. मंगळवारी उशिरा सायंकाळी शिक्षणाधिकार्‍यांनी ७१ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित केली आहे. ही पाहण्यासाठी शिक्षक गर्दी करीत आहेत. २0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार महिनाभरापूर्वी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हय़ातील शाळांकडून अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या माहितीसह त्यांचे विषय, आरक्षण आदी माहिती मागविली होती. त्यानुसार शाळांनी माहिती दिली. अतिरिक्त शिक्षकांची माहिती प्राप्त झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडे काही शिक्षकांनी आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात सुनावणी घेऊन अतिरिक्त शिक्षकांबाबत योग्य निर्णय घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. शिक्षण विभागाने अंतिम अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करून पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविली होती. शिक्षण आयुक्तांनी यादीस मान्यता देऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, दिनेश तरोळे यांनी ७१ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित केली. यासोबतच रिक्त जागा असलेल्या शाळांचीही यादी शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात आली. येत्या दोन दिवसांत अतिरिक्त शिक्षकांनी, त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळा निवडल्यानंतर लगेच त्यांना पसंतीच्या शाळेतील रिक्त जागेवर रुजू होण्याबाबत आदेश देण्यात येईल. रिक्त पद असलेल्या शाळेचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता, शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेणे बंधनकारक राहणार आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षक गर्दी करीत आहेत.

शिक्षकांच्या हरकती ऐकून घेणार! संकेतस्थळावर भरलेल्या अतिरिक्त शिक्षक व रिक्त पदांबाबत शिक्षकांनी हरकत असल्यास किंवा आक्षेप नोंदवायचा असल्यास त्यांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह लेखी हरकत सादर करावी. या हरकती शिक्षकांनी लेखी स्वरूपात वरिष्ठ लिपिक आर.पी. खडसे यांच्याकडे सादर कराव्यात. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे ऑनलाइन पद्धतीने व समुपदेशनाद्वारे करण्यात येईल. 

२0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार विविध शाळांमध्ये ९१ रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. काही शिक्षकांच्या हरकती, आक्षेप असतील, तर तेही ऐकून घेण्यात येतील आणि त्यानंतर निर्णय देऊन त्यांचे समायोजन करण्यात येईल.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.