अकोला - जळगाव खांदेशमधून येणार्या अमर टोल्ड व अमर गोल्ड दुधात भेसळ होत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी मध्यरात्री दुधाचे नमूने घेतले. प्रशासनाने सुमारे १.५ लाख रुपये कीमतीचे दुध जप्त केले असून दुधाचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगीतले.जळगाव खान्देश येथून रोज मध्यरात्री विविध खासगी कंपन्यांचे हजारो लीटर दुध अकोल्यात पुरवठा करण्यात येते. यामध्ये अमर गोल्ड व अमर टोल्ड या खासगी कंपनीच्या दुधाचा समावेश आहे. या खासगी कंपनीचे पाकीट बंद असलेले सुमारे १.५ लाख रुपयांचे दुध अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फीरत्या प्रयोगशाळेच्या अधिकार्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. या दुधामध्ये भेसळ असण्याची दाट शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी शनिवारी मध्यरात्री ही कारवाई केली असून या दुधाचे नमूने रात्री उशीरा घेण्यात आले. हे नमूने चाचणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येणार असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सांगी तले.
भेसळीचा संशय, दुधाचे घेतले नमुने
By admin | Updated: September 21, 2014 01:48 IST