शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडातील रस्ते, जलयुक्त शिवारची चाैकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 10:53 IST

Akola News ७०० काेटी रुपयांतून तयार हाेणाऱ्या रस्त्यांची तसेच जलयुक्त शिवारमधील कामाची चाैकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहे.

ठळक मुद्देहायब्रिट ॲन्युइटीअंतर्गत पश्चिम वऱ्हाडातील रस्ते कामांचे भूमिपूजन केले हाेतेशेगाव ते अकाेला ते वाशिम या प्रमुख दिंडीमार्गाचा समावेश आहे.चाैकशीत काय निष्पन्न हाेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- आशिष गावंडे

अकाेला:  पश्चिम वऱ्हाडातील अकाेला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात हायब्रिट ॲन्युइटी अंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे ७०० काेटी रुपयांतून तयार हाेणाऱ्या रस्त्यांची तसेच जलयुक्त शिवारमधील कामाची चाैकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता पी. डी. नवघरे यांना चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश ७ जानेवारी राेजी दिले आहेत. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०१८ मध्ये हायब्रिट ॲन्युइटीअंतर्गत पश्चिम वऱ्हाडातील रस्ते कामांचे भूमिपूजन केले हाेते. यामध्ये प्रामुख्याने शेगाव ते अकाेला ते वाशिम या प्रमुख दिंडीमार्गाचा समावेश आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य गाेपीकिशन बाजाेरिया यांनी सदर रस्त्याच्या दर्जावर व शासनाकडून प्राप्त निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत याविषयी शासनाकडे चाैकशीची मागणी केली हाेती. तसेच पश्चिम वऱ्हाडात जलयुक्त शिवार याेजनेच्या कामात माेठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यामुळे या कामांचीही चाैकशी करण्याची मागणी त्यांनी केली हाेती. शासनाने अमरावती विभागातील मुख्य अभियंता पी. डी. नवघरे यांना रस्त्यांच्या चाैकशीचे निर्देश दिले आहेत. या चाैकशीत काय निष्पन्न हाेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

२५ लाख खिशात घालणारा काेण?

एकीकडे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच दुसरीकडे परभणी येथील संबंधित कंत्राटदाराकडून तब्बल २५ लाख रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. याप्रकरणी शासनाने चाैकशीचे आदेश दिल्यानंतरही २५ लाख खिशात घालणारा व्यक्ती काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

 

दाेन्ही आमदारांत जुंपणार

हायब्रिड ॲन्युइटीअंतर्गत तयार हाेणाऱ्या रस्त्याचे बहुतांश काम शिवसेनेचे आ. नितीन देशमुख यांच्या बाळापूर मतदारसंघात हाेत आहे. यामध्ये पारस, निमकर्दा, गायगाव, गाेरेगाव ते माझाेड, भरतपूर, नकाशी, वाडेगाव ते पातूरचा समावेश असून आ. बाजाेरियांच्या तक्रारीमुळे रस्ते कामाला खीळ बसण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आगामी दिवसांत या दाेन्ही आमदारांत चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.

 

कंत्राटदारांची बांधकाममंत्र्यांकडे धाव

दरम्यान, याप्रकरणी संबंधित कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशाेकराव चव्हाण यांच्याकडे धाव घेऊन इत्थंभूत माहिती सादर केल्याचे बाेलल्या जात आहे.

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग