शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात खासगी वाहनधारकांची अरेरावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:06 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर खासगी वाहने उभी करून गर्भवतींचे नातेवाईक म्हणून हे वाहनधारक रुग्णालयात प्रवेश करतात.

अकोला : जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णवाहिका कार्यरत असतानाही परिसरात दलालांच्या सहकार्याने खासगी वाहनधारकांकडून अरेरावी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खासगी वाहनधारकांकडून शासकीय रुग्णवाहिकेच्या चालकांना मारण्याची धमकी मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी गुरुवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली.जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत शासकीय वाहनानेंच नवजात शिशुसह मातेला घरपोच पोहोचविण्यात येते; परंतु जिल्हा स्त्री रुग्णालयात काही दलालांच्या सहकार्याने खासगी वाहनधारकांकडून गर्भवतींसह नातेवाइकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर खासगी वाहने उभी करून गर्भवतींचे नातेवाईक म्हणून हे वाहनधारक रुग्णालयात प्रवेश करतात. या ठिकाणी ते दलालांच्या मदतीने गर्भवती व त्यांच्या नातेवाइकांची दिशाभूल करत त्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेच्या चालकांनी खासगी वाहनधारकांना रोखले असता, त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी शासकीय रुग्णवाहिकाचालकांनी गुरुवारी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेत त्यांना झालेल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी खासगी वाहनधारकांविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जिल्हा स्त्री रुग्णालयातही दलाल सक्रियसर्वोपचार रुग्णालयासोबतच जिल्हा स्त्री रुग्णालयातही दलाल सक्रिय असल्याचे या निमित्ताने समोर आले; परंतु त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचेही वास्तव आहे.

या वाहनांवर कारवाईची मागणीपोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात एमएच-३० ए.एफ.१७८, एमएच ३० ए.ए.-३१७०, एमएच-२८ व्ही.२९९५, एमएच-३० ए.झेड.७४०९, एमएच-३० ए.एफ.२८०६, एमएच -३० ए.टी.१७४५ या क्रमांकाचे वाहने दिसताच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हा स्त्री रुग्णालयात दलालांसोबतच खासगी वाहनधारकांकडून अरेरावी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामदासपेठ रुग्णालयात तक्रार दिली असून, कारवाईची अपेक्षा आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालय